नांदेड। देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे आज ३१ ऑगस्ट व उद्या १ सप्टेंबर रोजी होत आहे. या निमित्त राज्यातील हजारो पत्रकारांचा मेळा साईबांबाच्या नगरीत भरणार आहे. या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रलंबित समस्या, प्रश्नांवर चर्चा, ठराव होणार आहेत. त्याचबरोबर दोन दिवसांत पत्रकारांसाठी विविध चर्चासत्रे, बौध्दिक व सांस्कृतिक मेजवानीचेही आयोजनही करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील जवळपास १०० पत्रकार या अधिवेनात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत.
व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाचे सकाळी ११ वाजता विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोन्हे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार हेमंत पाटील, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपाणी, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती हेमलता अरुण शितोळे पाटील व भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाचपुते हे प्रमुख अतिथी असणार आहेत.
अधिवेशनाचा समारोप दि. १ सप्टेंबर रोजी होणार आहे. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॉग्रेसचे विधीमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात, आ. लहू कानडे, आ. क्षितिज ठाकूर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, साईबाबा विश्वस्त संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडियात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे. व्हॉईस ऑफ मीडिया‘ पत्रकार संघटनेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे यांच्या नेतत्वाखाली शिर्डी येथे हे अधिवेशन होत आहे. व्हॉईस ऑफ मीडिया‘ पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह शंतनु डोईफोडे, प्रदेशसह सरचिटणीस पंढरीनाथ बोकारे,विश्वनाथ देशमुख, संघटक नागोराव भांगे पाटील, जिल्हा अध्यक्ष श्रीनवास भोसले, शहर अध्यक्ष डॉ गणेश जोशी,बाळासाहेब पांडे, ऋषीकेश कोंडेकर यांच्या सह मोठ्या संख्येने नांदेड जिल्ह्यातील पत्रकार अधिवेशनात सहभागी होणार आहेत.