नवीन नांदेड। साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्ताने शाहुनगर, राहुल नगर, वाघाळा साठे नगर, नविन नांदेड हाडको येथे २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ध्वजारोहण, बालाजी पाटील पुयड पुणेगावकर यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी फारुक अहेमद ,व मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार असून सायंकाळी ६ वाजता गायिका भक्ती भारती हिंगोली, पुजा गायकवाड,शाहीर व्यंकटी सोनटक्के यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सोहळ्याला समाज भुषण प्रा.रामचंद भरांडे, रावसाहेब पवार यांच्यी तर संजय पाटील पोगरे, सौ.बेबीताई जनार्धन गोपिले माजी नगरसेविका. वैजनाथ देशमुख, पप्पू गायकवाड ,आनंदा सोनकांबळ, माधव डोपंले ॲड.आनंदा सुर्यवशी, हरिशचंद्र एकनाथ गोपले सेवानिवृत्त सैनिक, दुभाष आत्माराव मुजाजी वाघमारे,व्यकटी गणपती शिंदे.बि.एस. पाटोळे (माजी सैनिक)आहे.
प्रमुख ववत्ते गजानन पट्टेवाई ,सारिक ,कैलास दिनावर कावळे ,गजानन शिंदे भगवान जमदाडे, यांच्या सह पत्रकार बांधव मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार आहे. या जयंती सोहळ्याला समाज बांधव यांच्या सह नागरीक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती मंडळ अध्यक्ष डी.एम. देव कांबळे, उपाध्यक्ष,अशोक दर्शने, अशोक गायकवाड गोळेगावकर, रघुनाथ शिंदे दयानंद घंटेवाड, केशव शिंदे, संजय दाडेल, सुनील फुगारे, गजानन शिरसे, गोविंद वाघमारे, अनिल कांबळे पदाधिकारी यांनी केले आहे.