नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी मालमत्ता कर वसुली प्रमाण कमी व अनेक वर्षांपासून एकच ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांच्या बदल्याचे आदेश २७ जुन रोजी काढले असुन यात सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या दोन कर निरीक्षकसह पाच वसुली लिपीक यांच्या समावेश आहे. या ठिकाणी ईतर अनेक कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडुन बसले असुन त्यांची मात्र बदली करण्यात आली नाही अशी चर्चा कर्मचारी मध्ये होती.
नावामनपाचे आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांनी मुख्यालयासह ईतर सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लिपीक यांनी मालमत्ता कर व पाणी कर वसुली करण्याचे प्रमाण कमी व प्रशासकीय कारणास्तव पदस्थापना, एकच ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडुन बसलेल्या ३८ कर्मचारी व १३ लिपीक यांच्यी बदल्या करण्याचे आदेश काढल्या नंतर कर्मचारी मध्ये खळबळ उडाली.
यात सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेले कर निरीक्षक सुधीर बैस यांच्यी मुख्यालयातील महिला बाल कल्याण व दिपक पाटील यांच्यी दिव्यांग कक्षात लिपीक या पदावर करण्यात आली आहे तर वसुली लिपीक मारोती चव्हाण, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ३ गणेश नगर, सुखदेव जौधंळे,मातृ सेवा केंद्र सिडको, संतोष भदरगे क्षेत्रीय कार्यालय २ अशोक नगर,संदीप धोंडगे, गुंठेवारी विभाग,संजय ढेगळे, यांत्रिकी विभागात यांच्यी बदली करण्यात आली. सात कर्मचारी बदलीवर गेले असुन नव्याने संजय नागापूरकर, विवेकानंद लोखंडे,अशोक भंडारे,बालाजी कल्याणकर,महेद्रं पठाडे,हे पाच जण बदलुन आले आहेत. सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडुन बसलेले अनेक कर्मचारी आहेत यांची बदली कधी होणार आहे अशी चर्चा कर्मचारी मध्ये चालू होती.