हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| श्रीमद भागवत महापुराण म्हणजे कल्पतरुच झाड आहे, याचे श्रावण करणाऱ्यांचे आयुष्य आनंदमय होऊन जाते. भागवत कथेत सूत मुनीने सहा प्रश्न विचारले आहेत, भगवान परमात्माणे 24 अवतार घेतले असून, हिंदू संस्कृती टिकविण्यासाठी आणि संस्कृतीचे जतंन करायचे असेल तर लहापाणीपासून आपल्या मुलांना धार्मिक पुस्तिकेची ओळख करून घ्या असे विचार भागवताचार्य हभप. कु. वैष्णवी दीदी गौड यांनी उपस्थितांना दिला.
त्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या मंचावरून उपस्थित महिला – पुरुष भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. श्रावण महिन्यात हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात आत्तापर्यंत शिवमहापुराण, संत ज्ञानेश्वर माऊलींची गाथा आणि सध्या श्रीमद भागवत कथेचे प्रवचन सुरु आहे. या मंचावरून भागवताचार्य हभप.वैष्णवी दीदी गौड या उपस्थित भाविकांना भागवत कथेतून धार्मिकतेची ओळख करून देऊन एक दिशा दाखविण्याचे काम करत आहेत. मनुष्याने जन्म घेताना काहीच आणलं नाही आणि जाताना देखील काहीच नेणार नाही… त्यामुळे मनुष्य जीवनात प्रत्येकाने एक महिना पंढरीच्या वारीसाठी द्यावा यामुळे संपुर्ण आयुष्य सुधारून जाईल.
संसार करताना मनुष्याने परमार्थाची जोड ठेवणे या कलियुगात अत्यंत आवश्यक आहे, या जगात आपल काहीच नाही त्यासाठी मनुष्याने सढळ हस्ते दान करावे, भुकेल्याला अन्नदान करावे. जिथे कुठे धार्मिक कीर्तन, प्रवचन सुरु आहे. तिथे उपस्थित होऊन कथा श्रवण करावी. भागवत कथेत सूत मुनीने सहा प्रश्न विचारले आहेत… भगवान विष्णू परमात्माणे 24 अवतार घेतले असून, यामध्ये दहा अवतार मुख्य मानले जातात. मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, कल्की अवतार आहेत. धर्मग्रंथ अनुसार श्रुष्टीची सुरुवातीला परमपितामह ब्रम्हाजीनी घोर तपस्या केली. त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने सूर्य म्हणजे तपश्चर्या या नावाने सनक सनंदन, सनातन आणि सनतकुमार या चार ऋषींच्या रूपात पहिला अवतार घेतला. तीच हिंदू संतान संस्कृती पाळायची असेल आणि त्याचं ज्ञान आत्मसात करायचं असेल तर लहापाणीपासून आपल्या मुलांना धार्मिक पुस्तिकेची ओळख करून घ्यायाला हवी हे प्रत्येक पालकांचा कर्तव्य आहे असा उपदेशही त्यांनी दिला.
दरम्यान कथेत बुधवारी हिमायतनगर येथील तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार व श्री परमेश्वर मंदिराच्या पदसिद्ध अध्यक्षा सौ पल्लवी टेमकर यांनी भेट देऊन प्रथमतः श्री परमेश्वर दर्शन घेतलं, तसेच येथे सुरू असलेल्या भागवत कथेत उपस्थित होऊन हभप वैष्णवी दीदी गौड यांच्या मधुर वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेचा आनंद घेतला. त्यानंतर मंदिरात बालयोगी व्यंकटस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या ओम नमः शिवाय नामजप यज्ञात सहभागी होऊन पुण्य पदरी पाडून घेतले. त्यानंतर श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने भाविकांना दररोज सुरु असलेल्या महाप्रसाद आनंदानं कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसाद वितरण केला. यावेळी त्यांनी बालकीर्तनकार कु.वैष्णवी दीदी यांनी लहान वयात भगवंताच्या ज्ञानाच्या प्रसार कार्याचे कौतुक करून भविष्यात नामवंत कीर्तनकार भागवताचार्य म्हणून ख्याती मिळवावी अश्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्री परमेश्वर मंदिराकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक भरभरून केले.
श्रावण महिन्यात अन्नदान पंगतीसाठी अनेकांनी केलं सहकार्य
श्री लक्ष्मीकांत देशपांडे यांच्यातर्फे 35 कैरेट केळी वाटप करण्यात आले.
हरिपाठ भजनी मंडळ, हिमायतनगर सर्वानी मिळून अन्नदान केलं.
सौ.नीता कदम पोलीस उपनिरीक्षक यांच्यातर्फे आनंदानं करण्यात आले.
श्री लक्ष्मीकांत बाबुअप्पा बंडेवार यांच्या वतीने आनंदानं करण्यात आले.
श्री कांता गुरू वाळके, पुरोहित यांच्यातर्फे आनंदानं करण्यात आले.
डॉ रेखा चव्हाण यांच्यातर्फे दिवसभर साबुदाणा वितरण करण्यात येऊन रक्तदान शिबीर घेण्यात आले.
श्री परमेश्वर वानखेडे यांच्याकडून चहा आणि साबुदाणा वितरण करण्यात आला.
श्री गजानन शिंदे, ग्रामसेवक यांच्या वतीने आनंदानं करण्यात आले.
श्री विकास पाटील त्यांच्यातर्फे 11 कैरेट केळीचे वाटप करण्यात आले.