भोकर, गंगाधर पडवळे| ज्यांचा थेट पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सारख्या दिग्गज राजकीय मंडळी सोबत जवळचे संबंध असलेले आणि एके काळीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जुने घराणे म्हणून ज्यांची ओळख असलेल्या राजे रंगराव देशमुख पळशीकर यांचे सुपुत्र राजा खंडेराव देशमुख पळशीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या हम बोलेसो कायदा या या भूमिकेला कंटाळून काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला होता. परंतू आता त्याच बड्या नेत्याने काँग्रेसला राम राम करून राज्यसभेची खासदारकी मिळवत भाजपाचे कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळे भाजपातही परत एकदा हुकूमशाही सुरु झाली, असून इतरांना पुढे जाण्याची संधी नाहीत आणि माझेच सर्वांनी ऐकले पाहिजे म्हणत या नेत्याने एका प्रकारे हुकूमशाही कडे वाटचाल सुरु केली असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. यामुळे या अशा एकाधिकिशाहीच्या विळख्यातून बाहेर पडून मुक्त वातावरणात लोकांत मिसळून आपल्याला राहण्याची सवय असल्यामुळे लवकरच राजा खंडेराव देशमुख पळशीकर हे कमळाची साथ सोडून पुन्हा एकदा घरवापसी करत लवकरच परत एकदा काँग्रेस पक्षाचा ‘हात’ हाती धरणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून माहिती आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
एके काळीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जुने घराणे म्हणून ज्यांची ओळख असलेल्या राजे रंगराव देशमुख पळशीकर यांचे सुपुत्र राजा खंडेराव देशमुख पळशीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या एकाधिकारशाहीला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडून भाजपाचे कमळ हाती धरले होते.परंतू त्याच बड्या नेत्याने भाजपावासी होऊन राज्यसभेची खासदारकी घेऊन परत एकदा भाजपात एकाधिकारशाही सुरु केली असून इतरांना पुढे न जाऊ देता सर्व काही मिच आणि माझेच सर्वांनी ऐकले पाहिजे म्हणत या नेत्याने एकाधिकिशाही सुरु केली आहे.असे बोलल्या जात असून याच एकाधिकार शाहीच्या ओझ्याखाली दम घुसमटत असल्याने राजा खंडेराव देशमुख पळशीकर हे भाजपाचे कमळ सोडून पुन्हा एकदा घरवापसी करत लवकरच काँग्रेस पक्षाचा ‘हात’ हाती धरणार असल्याची विश्वसनीय सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
ज्यांचे वडील तेव्हांच्या आंध्रप्रदेशातील आदिलाबाद जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष राजे रंगराव देशमुख पळशीकर हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जुने नेते म्हणून तत्कालीन आंध्रप्रदेश व आजचे तेलंगणा राज्य आणि महाराष्ट्रात सर्वपरिचित आहेत. त्याचं बरोबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, पंतप्रधान इंदिरा गांधी, पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव, मुख्यमंत्री चेन्ना रेड्डी आदि राजे रंगराव देशमुख पळशीकर यांचे अतिशय विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती व यांचे अतिशय घानिष्ठ संबंध होते. पळशी हे सद्याच्या तेलंगणा राज्यातील व महाराष्ट्रातील भोकर तालुक्यातील ,दिवशी खु .हे त्यांचे गाव. तेलंगणातील आदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वरंगल व खम्मम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळायचा विषय म्हणजे सिंचन त्यासाठी निजामाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर मोठे तत्कालीन पोचमपाडू व सध्याचे श्रीरामसागर धरण उभारण्यात आले आहे.त्या धरणाचे भूमिपूजन दि.२६ जुलै १९६३ रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आला.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
हे धरण उभारणीत व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना तेथे आणण्यात राजे रंगराव देशमुख पळशीकर यांचा सिंहाचा वाटा आहे.एवढेच नव्हे तर माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांना सन १९६२ मध्ये भोकर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदा उमेदवारी मिळवून देण्यात राजे रंगराव देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे.याच बरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे ते सासरे होत.तसेच आपली शेकडो एकर जमीन गरीब शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी देणारे दानशूर व्यक्तीमत्व म्हणून राजे रंगराव देशमुख पळशीकर यांना ओळखल्या जाते.गरीबो का दाता अशी त्यांची ओळख होती.तर त्याकाळी गोरगरीब जनतेला शिधा पत्रिकेवरील राशन मोफत देण्याची काम त्यांच्या काळात केल गेल्याच सांगण्यात येते.
एवढा मोठा सामाजिक व राजकीय वारसा असलेल्या मोठ्या घराण्यातील राजा खंडेराव रंगराव देशमुख पळशीकर यांचे देखील तेलंगणा व नांदेड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, व्यवसायिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात मोठे योगदान असून दोन्ही राज्यातील जनतेशी त्यांची ही नाळ जोडलेली आहे.त्यांनी भोकर विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती व जिल्हा सहकारी बँक यांसह आदींची निवडणूक लढविलेली आहे.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी या ‘देशमुख’ घराण्याची ‘नाळ’ जोडलेली असून राजे रंगराव देशमुख पळशीकर यांनी स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांना आमदार व मुख्यमंत्री करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.तर राजा खंडेराव देशमुख पळशीकर यांनी खा. अशोक चव्हाण यांना आमदार व मुख्यमंत्री होण्यापर्यंत कुठल्याही पदाची किंवा आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता एक सच्चा कार्यकर्ता म्हणून परिश्रम घेतले आहेत.
असे असतांनाही खा.अशोक चव्हाण यांनी आपली एकाधिकारशाही वापरून राजा खंडेराव देशमुख पळशीकर यांना पक्षात कधीच मोठे होऊ दिले नसल्याचे सांगितले जात आहे.व आपसूकच त्याची खडखद मनात आहे त्यांच्या त्या एकाधिकारशाहीलाच कंटाळून व त्यांच्या विरोधात भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून राजा खंडेराव देशमुख पळशीकर यांनी काँग्रेस पक्ष त्यागून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे कमळ हाती धरले.ज्या नेत्याच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजा खंडेराव देशमुख पळशीकर यांनी कमळ हाती घेतले होते तोच बडा नेता काँग्रेस पक्ष व भोकर विधानसभा मतदार संघाची आमदारकी त्यागून भाजपात आला आणि राज्यसभेची खासदारकी मिळवली.नेता म्हणून भाजपात काम करत असतांना त्यांनी भाजपातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे होती असे अपेक्षित होते.
परंतू तसे न होता सर्व काही मिच व सर्वांनी माझेच ऐकले पाहिजे आणि भोकर विधानसभा मतदार संघातून माझ्या मुलीलाच आमदार केलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.नव्हे तर पुन्हा एकदा भाजपात देखील त्यांनी एकाधिकारशाही सुरु केली आहे असे अनेकांतून बोलल्या जात आहे.याच एकाधिकाशाहीच्या ओझ्याखाली माजी मंत्री अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख यांचे मामाश्री तथा मोठा राजकीय वारसा असलेले राजा खंडेराव देशमुख पळशीकर यांचा दम घुसमटत असल्याची चर्चा होत आहे.याबाबद जाणून घेण्यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांशी व अन्य काही सुत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला आहे.
नव्हे तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या काही वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून राजा खंडेराव देशमुख पळशीकर हे भाजपाला सोडू चिठ्ठी देऊन लवकरच राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.तसेच त्यांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठी देणार असल्याचे ही बोलल्या जात असून त्यांच्या घरवापसीने आगामी विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदार संघात रंगत येऊन मविआ च्या उमेदवाराच्या मताधिक्यात मोठी भर पडणार आहे. तर मग प्रतीक्षा करूयात ते कधी घरवापसी करणार ? जर राजा खंडेराव देशमुख काँग्रेस वासी झाले तर त्यांच पक्षांतर भाजपा ला परवडणार का?हे येणारा काळचं सांगेल.