नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेले शेख शादुल शेख लाल ,मधुकर शिंदे,परमेश्वर कदम यांच्यी उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बदल पोलिस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते स्टार लावून सत्कार करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 27 नोव्हेंबर 24 रोजी काढलेल्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथील तीन जणांना उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. परमेश्वर कदम यांच्या स्टार लावून पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी स्टाफ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.