राजकारणातला हिरा माणूस स्व.लक्ष्मणराव शक्करगे अनंतात विलीन – NNL

0
दिलेला शब्द जपणारा नेता आमच्यातून निघून गेले - आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केली भावना, छायाचित्र अनिल मादसवार

हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील जेष्ठ नागरिक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे जेष्ठ संचालक लक्ष्मणराव गिरजप्पा शक्करगे यांचे वयाच्या ८५ व्या वृद्धापकाळाने दि. २२ सायंकाळी ३.३० वाजता निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर दि. २३ रविवारी दुपारी १ . ३० वाजता बोरी – उमरखेड रस्त्यावर त्यांचे शेतात हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत वीरशैव धर्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

जेष्ठ संचालक लक्ष्मणराव गिरजप्पा शक्करगे यांचा निधन झाल्याची वार्ता समजताच दि. २३ रविवारी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून लक्ष्मणराव शक्करगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हिमायतनगर बंद हा सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाळून बाजारपेठ बंद यशस्वी केला. शक्करगे यांनी आपल्या ५४ वर्षीच्या राजकीय, सामाजिक जिवनात जिल्हा परिषद सदस्य पद दोन वेळा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, हिमायतनगर शहाराचे सरपंच, हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेवट पर्यंत श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे संचालक अशी अनेक पदे भूषविली. राजकारणातला हिरा माणूस म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती.

त्यांच्या अंत्यविधीला आ माधवराव पाटिल जवळगावकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, श्यामराव देशमुख, श्री परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, माधव महाराज बोरगडीकर, श्री गुंजकर, माजी जी प सदस्य समद खान पठाण, धानोरा सोसायटीचे चेयरमन गणेश शिंदे, उबाठाचे तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे, माहूरचे प्राध्यापक विश्वासराव जाधव, यांनी स्वर्गीय लक्ष्मणराव शक्करगे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील, खा. नागेश पाटील आष्टीकर, खा वसंतराव चव्हाण, नांदेडचे माजी खा व्यंकटेश काब्दे यांनी शोकसंदेशात पाठविला तो सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी वाचून दाखवीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

याप्रसंगी हिमायतनगर भूषण शाहीर बळीराम हनवते, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, सभापती जनार्धन ताडेवाड, माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल, शिवसेना तालुका प्रमुख शिंदे गट रामभाऊ ठाकरे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे, प्रहारचे तालुकाध्यक्ष दत्ता देशमुख, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, कुणाल राठोड, आदींसह हजारोंच्या संख्येने महिला पुरुष नातेवाईक अंत्यविधीला उपस्थित झाले होते.

दिलेला शब्द जपणारा नेता आमच्यातून निघून गेले – आ माधवराव पाटील जवळगावकर
आदर्शवत लढवय्या लोकनेता, हिमायतनगर तालुका भूषण लक्ष्मणराव शक्करगे यांच्या 86 वर्षाच्या कालखंड आज समाप्त झाला आहे. माझ्या वडिलांसोबत त्यांनी काम केलं, त्यांना मी जवळून पहिले असून, त्यांचा मी माझा राजकीय गुरु समजतो. त्यांच्या जाण्याने पारोवरावर दुःखाचा डोंगर कोसळला ईशव त्यांना यातून सावरण्याची शक्ती देऊ. एक सर्वसामान्याच्या हिताचे काम करणारा आणि दिलेला शब्द जपणारा नेता आमच्यातून निघून गेले अश्या शब्दात हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here