श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर येथील रेती तस्करांचे सुरेख किस्से नवीन नाहीत. पैनगंगा नदीवरील वाळू तस्करी थांबविण्यासाठी महसूल विभाग देखावा करीत असला तरी वाळू चोरट्यांसोबत त्यांचे मधुर संबंध आता लपून राहिलेले नाही. डीलिंग फिस्कटल्यावर कारवाईचे काही प्रकरण समोर येतात.परवाच महसूल विभागात महाकाल म्हणून मिरवणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी विदर्भ सीमेवरील धनोडा येथे मांडवली झाल्याची चर्चा असून महाकाल च्या ही डोक्यावर महसूल विभागाचा खाजगी वाहन चालक उर्फ नंदी ने सायफळ वाल्यांचे बेलपत्र वाहील्याची चर्चा आहे.


माहूर तालुक्यात पैनगंगा नदी वळसा घालून वाहते.या ठिकाणी अवैध वाळू तस्करी वाहतूक ही नित्याची बाब झाली आहे,त्यात वडसा, पडसा, सायफळ, टाकळी,हिंगणी बोंडगव्हाण, हडसणी,कुपटी,नेर,या वाळूपेंडाचा समावेश असून नुकतीच एका पत्रकाराला वाळू तस्करीचे चित्रीकरण करताना वाळू चोरट्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

ही घटना ताजी असतानाच बोंडगव्हाण येथे कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा खोटं गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सिंदखेड पोलीस ठाण्या हद्दीत झाला होता. तर सायफळ वाळू पेंडावर तलाठ्या च्या दुचाकीचे दोन्ही टायर फोडून त्यांना नदी पात्रात जाण्यास रोखले होते.बीड जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचे प्रकरण राज्यभर गाजत असताना माहूर तालुक्यात सुद्धा वाळू माफियांचा उच्छांद तालुक्यातील सामाजिक स्वास्थ कधी बिघडेल याचे नेम नाही.

वाळू चोरट्यांची दादागिरी प्रशासनाच्या सहकाऱ्यांनी त चालत नाही ना अशी शंका सुद्धा शांतता प्रेमी नागरिकांना असून कालच चिखली येथे पोलीस व वन विभागाच्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या ताब्यावर झालेला हल्ला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाढलेले मोनेबल अधोरेखित करत असून या हल्यात माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव हे गंभीर जखमी झाले आहे.

हाताच्या काकण्याला आरशा कशाला या उक्तीप्रमाणे पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे वाळू तस्करीचे व त्या संबंधित गुन्हे दाखल असलेल्या मंडळींची यादी करून त्याची माहिती जिल्हा अधिकारी व जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडे पाठवून संघटित गुन्हेगारी या शीर्षकाखाली मकोका व हद्दपारी सारख्या कारवायांची नितांत गरज आता निर्माण झाली आहे.केवळ महसूल च्या एका महाकाल च्या डोक्यावर बेलपत्र वाहण्यात आले असे नाही तर अनेकांचे हात याच्यात माखले असल्याने दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.