नवीन नांदेड l नवीन नांदेड शहरा लगत असलेल्या सिडको औद्योगिक वसाहतीतील कार्यरत असलेल्या अनेक ऑइल मिल मधून निघालेली काळी राख सिडको हडको परीसरात हवेच्या माध्यमातून पसरल्या मुळे परिसरातील नागरिकांनी अनेक आरोग्य विषयक समस्या तोंड द्यावे लागत आहे.


संबंधीत प्रदुषण विभागाने तात्काळ कार्यवाही करून परिसरात येणारी काळी राख बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सिडको हडको परीसरा लगत असलेल्या औधौगिक वसाहतीतील कार्यरत असलेल्या अनेक ऑईल मिल कारखाने असून दरवर्षी सिडको हडको परिसरातील अनेकांच्या निवासस्थानी छतावर, अंगणात, चारचाकी, दुचाकी वाहनांवर मोठ्या प्रमाणात काळी राख मोठ्या प्रमाणात साचत आहे तर सकाळी फिरणाऱ्या अनेक जेष्ठ नागरिक युवक यांच्ये नाकात , डोळ्यात,जात असल्याने आरोग्य धोक्यात आले.

असून या काळया राखेची योग्य ती विल्हेवाट लाववी व सिडको हडको परीसरातील नागरीकांना या त्रास पासून मुक्त करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने संबंधीत विभागाला व परिसरातील असणाऱ्या कारखाना दारांना उत्तर देऊ असा ईशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांनी दिला आहे.
