किनवट, परमेश्वर पेशवे | रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला आलेल्या पुरात प्रवाशासह ऑटो वाहून गेल्याची धक्कादायक घटना नांदेड किनवट तालुक्यातील कुपटी ते नंदगाव जाणाऱ्या रोडवरील कुपट्टीच्या पुलावर 15 जुलै 2024 च्या रात्री अंदाजे नऊ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
ऑटो क्रमांक ए .पी . 01 एक्स 086 या क्रमांकच्या ऑटोने दोन महिला व एक पुरुष हे तिघेजण कोसमेट हुन नंदगाव येथील नातेवाईकाकडे जात असताना कुपटी ते नंदगाव रोडवरील कुपटी येथील ओढ्याला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात हा ऑटो प्रवाशासह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.
मात्र सुदैवाने यातील ऑटो चालक परमेश्वर निवृत्ती ढाले राहणार डोंगरगाव वय 38 वर्ष लक्ष्मीबाई परमेश्वर ढाले राहणार डोंगरगाव व 34 वर्ष व रंजनाबाई परसराम टारपे वय 33 वर्ष हे तिघेही बाल बाल बचावले. पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की हा ऑटो पुराच्या पाण्यात जवळपास दीड किलोमीटर वाहत गेला.
सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवित हानी झाली नाही मात्र हे सर्व आदिवासी महिला व पुरुष ऑटोच्या व पुराच्या पाण्यातून बाहेर निघण्यासाठी एका झाडाच्या मुळीचा आधार घेत हे तिघेही बाहेर निघाल्याची माहिती या घटनेतील ऑटो चालक परमेश्वर निवृती ढाले यांनी ही माहिती दिली आहे.
ऐन पावसाळ्यात हा पुल सर्वांसाठीच एवढा घातक आहे की या ओढ्याला पुराचे पाणी केव्हा येईल आणि अशा दुर्दैवी घटना घडतील हे सांगता येत नाही, या अगोदर काही वर्षांपूर्वी असेच अचानक ओढ्याला पुर आला आणि बैलगाडी सह शेतकरी वाहून गेला होता त्यामध्ये शेतकरी बचावला मात्र बैल दगावले अशा या घटना नेहमीच इथे घडत असतात त्यासाठी कुपटी ते नंदगाव जाणाऱ्या रोडवरील कुपटी येथील या फुलाची उंची वाढून देण्यात यावी अशी मागणी या भागातून होत आहे.