नवीन नांदेड| शिवाजी विद्यालय सिडको येथे इयत्ता दहावीच्या 1994 विशेष प्रावीण्य मिळालेल्या तुकडीतील विधार्थीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांनी ढोल लेझीमच्या साह्याने मोठ्या आनंदाने प्रभात फेरी काढली. तीस वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा वृक्ष शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्या काळात शिक्षण घेत असताना आपल्याला आलेल्या अडचणी त्यांनी मांडल्या. मराठी शाळेमध्ये शिकून सुद्धा अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत,असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी खूप दुरून दुरून स्नेहसंमेलनास एकत्र आली.त्यात श्री बालाजी बोरलेपवार हे नेदरलँड देशावरून आले होते. या कार्यक्रमा साठी सर्व मित्र-मैत्रिणीला एकत्र आणण्याचे काम प्रशांत खडकीकर यांनी केले.
या सोहळ्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रवी जाधव, मुख्याध्यापक एस.एम देवरे, अंकुशे , पांडे ,रेपेकर, क्षीरसागर शिंदे ,मुंडे रोडगे , विष्णुपुरीकर,जामकर, यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सौ. विष्णुपरीकर यांनी माजी विद्यार्थ्यांचा मराठीचा तास घेतला,आणि परत एकदा शाळेची आठवण करून दिली. किरण सूर्यवंशी यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भगिनींचा साडीचा आहेर देऊन सत्कार केला. व गुरूजनाचा व मान्यवरांच्या उपस्थित शाळा. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हे स्नेहसंमेलन यशस्वी बनण्यासाठी प्रशांत खडकीकर,गंगा मोहन शिंदे, सुहास मसलेकर,राहुल शिंदे, किरण सिंगोजी, किरण सूर्यवंशी,यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन मकरंद अचींतलवार सौ.सारिका बंगाळे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.अर्चना बासटवार यांनी केले.