नांदेड | महान गायक स्वर्गीय मुकेश यांच्या निवडक गीतांद्वारे स्वराभिनंदन व दै. प्रजावाणी प्रस्तुत भुली हुई यादे या कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास पावसाची संततधार असूनही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची निर्मिती विजय बंडेवार व मेघा गायकवाड-जोंधळे यांनी केली.
प्रारंभी प्रमुख अतिथी राजेंद्र हुरणे, जुगलकिशोर धूत, सौ. नंदा व इंजि. संजीवन गायकवाड, संपादक केशव घोणसे पाटील, पत्रकार प्रकाश कांबळे, अनिकेत बंडेवार, प्रमुख गायक गोविंद मिश्रा (मुंबई), प्रमुख गायिका मेघा गायकवाड, गायक विजय बंडेवार, शिवाजी टाक, दारा सौदे, वर्षा सौदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
भुली हुई यादे कार्यक्रमाच्या प्रारंभी जाने चले जाते है कहा हे गीत विजय बंडेवार यांनी सादर केले. डम डम डिगा डिगा व मेरा जुता है जापानी ही गीते शिवाजी टाक यांनी सादर केली. तद्नंतर सोचा था प्यार हम ना करेंगे ही गीतरचना शिवहार तोडकरी यांनी सादर केली. यानंतर सुप्रसिद्ध गायक गोविंद मिश्रा व ख्यातकीर्त गायिका मेघा गायकवाड यांनी तारों मे सज के, दिल तडप तडप के, बोल तेरी तकदीर मे क्या है, हम सफर मेरे हम सफर, कही करती होगी ओ मेरा इंतजार, ओ मेरे समन, फुल आहिस्ता फेको, किसी राह में किसी मोड पर, बागो में कैसे ऐ फुल खिलते है, एक प्यार का नगमा है, तुम रूठी रहो मै मनाता रहूँ, हम तो तेरे आशिक है ही सुरेल द्वंदगीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले व त्यांची प्रचंड वाहवा मिळविली. या सर्व गीतास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गाण्यातून कार्यक्रम बहरत गेला.
सुप्रसिद्ध गायक गोविंद मिश्रा यांनी किती की मुस्कराहटोंपर हो निसार, भुली हुई यादे व एक दिन मिट जायगा माटी के मोल या अजरामर रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली. सुप्रसित्र गायिका मेघा गायकवाड यांनी विजय बंडेवार यांच्यासोबत ऐ मेरे ऑखों के पहिले सपने, हम दोनो मिलके व शिवाजी टाक सोबत धिरे धिरे बोल कोई सुन ना ले हे द्वंदगीते सादर करून रसिकांत प्रचंड उत्साह निर्माण केला. गायक शिवाजी टाक व नवोदित गायिका वर्षा सौदे यांनी क्या खूब लगती हो व चल संन्यासी मंदिर में या रचना सादर केल्या.
मेघा गायकवाड यांनी लता मंगेशकर यांनी मुकेश यांना श्रद्धांजलीपर सादर केलेले कही दूर जब दिन ढल जाये या गीताद्वारे स्व. मुकेश यांना श्रद्धांजली अर्पण केली. तेरे हम सफर गीत है तेरे हे गीत गोविंद मिश्रा, दारा सौदे व मेघा गायकवाड यांनी सादर करून कार्यक्रमात उर्जा निर्माण केली व प्रेक्षकांस ताल धरावयास लावला. शेख समद यांनी एक रचना सादर केली. कार्यक्रमास प्रसिद्ध वादक राजेश देहाडे, राजेश भावसार, शेख नईम, अनिल जमदाडे, शुद्धोधन कदम व राहुल यांनी उल्लेखणीय संगीतसाथ दिली. शेवटी जिना यहा मरना यहा या विजय बंडेवार यांच्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.