नांदेड l नांदेड येथील भाग्यनगर-आनंद नगर रोडवरच्या ग्रँड तुलसी हाॅॅॅटेल मध्ये नुक्त्याच एका भव्य दिव्य कार्यक्रमात माय एफ एम समूह व प्रझेंटिंग स्पाॅन्सार मंथन इन्फ्राकेयरचे मा.पंकज शर्माजी व सौ.शर्माजी,असोशियट स्पाॅन्सार म्हणून नारायणी गर्ल्स होस्टेलचे मा.तेजस हळदे पाटील, आणि आॅटोमोबाईल्सचे पार्टणर राजयोग टाॅयाटोचे मा.व्यंकटेश पुदुचेत्ती या दिग्गजांच्या वतीने नांदेड शहरातील आरोग्य क्षेत्रात सातत्याने, सचोटिने, निस्प्रूह भावनेने तथा मानुस्कीच्या दृष्टीकोणातून समाजाच्या तळागाळातील सामान्य जनतेसाठी ज्यांनीं ज्यांनी , सामाज ऋण फेडण्याचे प्रयत्न केलेले आहेत,करत आहेत अशा वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित तपस्वींचा गुणीजनांचा शोध घेऊन अनेकांना गौरविण्यात आले!


त्यात वैद्यकीय, शैक्षणिक, साहित्यिक,सांस्कृतिक, सामाजिक,कृषी,क्रिडा,संगित, गरजवंत ज्येष्ठ नागरिक उत्थान आदि क्षेत्रात सतत कार्यरत असणारे कोरोना काळात स्तःचे प्राण धोक्यात घालून नांदेड मधील पंधरा हजार सामान्यांना “अर्सेनिकम अल्बम-30″ची मात्रा सर्वात आधी, विना शुल्क तथा विना मुल्य वाटप करणारे “कोरोना सेवा योद्धा तथा कोरोना हिरो” म्हणून गौरविलेले, ज्येष्ठ नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य यांना या पूर्वी,दोन वर्षापूर्वी दैनिक सकाळच्या वतिने मा.खा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते हाॅटेल रिट्ज मध्ये व या समूहाच्यावतिनेच या वर्षीही दुसर्यांदा गौरविण्यात आले व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.!


या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्याधिकारी मा. डाॅ.सौ.संगीता देशमुख व सहायक जिल्हा शल्य चिकित्सक मा.डाॅ.संजय पेरके यांची विशेष उपस्थित होती व मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्राप्त गुनीजनांना गौरविण्यात आले.


माय एफ एमशी प्रतिक्रिया देतांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य म्हणाले की, हा माझा वैयक्तीक सन्मान तथा गौरव मी मानत नाही,तर हा नांदेड नगरितील सामान्य जनतेचा सन्मान तथा गौरव आहे असे मी मानतो! माय एफ एम समूह व हा कार्य क्रम घडवून आणणार्या सर्व सहयोगी “रत्न पारखी कार्य कर्त्यांचा” मी तथा आम्ही आजचे सर्व गौरव मूर्ती त्यांचे कौतूक करतो, त्यांचे अभिनंदन करतो व ऋण व्यक्त करतो! आता आमची आजून जबाबदारी वाढली आहे असे मी मानतो!



