नांदेडकृषी

कृषी क्षेत्रातही उत्तम ‘करिअर’असल्याचा संदेश जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना पाठवा : सिईओ -NNL

· मिनल करनवाल यांच्याहस्ते शेतकरी, शास्त्रज्ञ व पत्रकारांचा सन्मान · विविध उपक्रमातून जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात साजरा

नांदेड,अनिल मादसवार| आपली बुद्धिमत्ता वापरून कल्पकतेने शेती केली तर या व्यवसायातून उत्तम असे करिअर निर्माण होऊ शकते. ज्या उच्चशिक्षित लोकांनी शेतीमध्ये स्वतःला झोकून दिले ते नोकरदारांपेक्षा अधिक चांगले जीवन जगत आहेत. शेतीत उत्तम करिअर आहे . मात्र या यशकथा जनतेपर्यंत पोहोचाव्यात अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज येथे व्यक्त केली.

20x10

Chidrawar

नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आज वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. आज कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषीनिष्ठ शेतकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे लाभार्थी, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यानंतर शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये पारंपारिक पद्धत सोडून शास्त्रीय दृष्टीने व कल्पकतेने मेहनत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

Saai

काहीच जमत नाही म्हणून शेती करण्यापेक्षा आपल्याला जे जमते ते करावे. कारण शेती हा विषय अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे ज्यांना या सर्व घटकांचा अभ्यास आहे. अशा व्यक्तीने अभ्यासपूर्ण रित्या यामध्ये झोकून दिल्यास अपयश मिळत नाही हे अनेकांच्या कर्तुत्वावरून सिद्ध झाले आहे. त्यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शेतीतही उत्तम करिअर आहे याची जाण नव्या पिढीला झाली पाहिजे यासाठी कृषी विभागाने विविध अभ्यासक्रमाप्रमाणे कृषी क्षेत्राची ही माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसह यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बोऱ्हाटे, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, कीटक शास्त्रज्ञ श्री.भेदे, डॉ.श्री शिवाजी शिंदे, भगवानराव इंगोले, कृषी अधिकारी पुंडलिक माने, मोहीम अधिकारी श्री कपाळे कृषी अधिकारी हुंडेकर, श्री निरडे, श्रीमती छाया देशमुख, सतीश सावंत, प्रेरणा धांडे, जिल्हा कृषी अधिकारी विजय बेतीवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, डॉ. शिवशक्ती पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमांमध्ये डॉ.अरविंद पंडागळे, डॉ. श्री.भेदे, प्राध्यापक देविकांत देशमुख, डॉ. सौ. माधुरी रेवणवार या कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ शिवाजी शिंदे, रामराव कदम, आर. पी. कदम, भगवान इंगोले, दत्तात्रेय नामदेवराव कदम,श्री.धोंडीबा इरवंत सुपारे, अंजनाबाई दिगंबर अंकुरवाड, शिवराज फुलाजी मुदखेडे, सुबोध महादेव व्यवहारे, बसवंत शंकरराव कासराळीकर, रत्नाकर गंगाधर ढगे, या राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नारायण देवराव कदम, ज्ञानोबा शेषेराव कोंके, सुधाकर सोपानराव भोसले, उद्धव कदम, या कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार तर कृषी क्षेत्रात काम करणारे पत्रकार ,रामेश्वर काकडे, प्रशांत गवळे, आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे लाभार्थी श्रीमती रंजना सुभाष सावंत, भगवान साधू ,नरवाडे उज्वला, रमेश पोहरे, गणपत गोपालजी नरवाडे, सिद्धार्थ विठ्ठलराव दुधमल यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित महिला शेतकरी श्रीमती कमलाबाई यांना राव धोत्रे श्रीमती सुषमा देव यांच्याही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन कपाळे मोहीम अधिकारी यांनी मानले.

nnlmarathi.com

Is Most Popular Marathi News Website from Nanded (India). We not only break news या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि लेखक, वार्ताहर, पत्रकार, संबंधित जाहिरातदारांची आहे. यास NNLMARATHIन्यूजचे प्रकाशक, संचालक/संपादक, मालक यांची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती, मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. यावरून काही वाद-विवाद निर्माण झाल्यास ते हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!