अर्धापूर| येथील प्रशासकीय इमारतीमधील दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल पंधरवडा दिन साजरा करण्यात आला. कार्यालयामध्ये आणि बाहेर रंगीबेरंगी फुले, फुगे लावून कार्यालयाची सजावट करण्यात आली. कार्यालय पक्षकारांचे स्वागतच करीत आहे, असे गौरव उद्गगार अनेक पक्षकांनी काढले. दुय्यम निबंधक श्रेणी १ व्ही. बी. पदमवार यांच्या कार्याचे अनेकांनी कौतुक केले.
या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात शासनाच्या खात्यात महसूल जमा झाल्याचे दुय्यम निबंधकानी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील अगदी जवळचा आणि बागायती असलेला अर्धापुर तालुका महाराष्ट्र राज्याला परिचित आहे. मागीलवर्षी या कार्यालयात 1 हजार 977 दस्त नोंदनी झाली आहे. आठ कोटी बारा लाख 90 हजार 30 रुपये एवढा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात हे कार्यालय अव्वल ठरले असल्याची माहिती दुय्यम निबंधक व्ही.बी. पदमवार यांनी दिली.
शासनास जास्तीत जास्त महसूल मिळवून देण्यास महामार्गा लगत असलेले अर्धापूर, कामठा बु, मालेगाव, पिंपळगाव, दाभड, लहान व पार्डी मक्ता या गावांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. पक्षकारांना मूल्यांकन काढून देणे, नोंदणीसाठी योग्य मार्गदर्शन दुय्यम निबंधक करत असतात. कार्यालयीन कामासाठी दुय्यम निबंधकाचे सहाय्यक बा. दि. अलगुंडे, संगणक चालक डी.एस. लांडगे यांच्यासह अनेकांचे सहकार्य आहे. मागील तीन वर्षात व्ही. बी. पदमवार यांनी उत्कृष्ट सेवा दिल्याचे अनेक पक्षकरानी सांगितले.