लोहा l गेली चारहून अधिक दशक संत वाङमय व संतांचे विचार किर्तन प्रवाचनाच्या माध्यमातील अनेक गावात निरपेक्ष भावाने पोहचविणारे हभप आत्माराम महाराज रामेज्वार रायवाडीकर याना संत मोतीराम महाराज पुरस्काराने देवाची आळंदी येथे खासदार संजय जाधव लोकमत समूहाचे संपादक संजय आवटे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
हभप आत्माराम महाराज रामेज्वार हे सत्तरच्या दशकात बीए मराठी पदवीधर आहेत.त्याचा संत साहित्यात गाढा अभ्यास असून प्रभावी वकृत्व आणि विविध विषयाचे ज्ञान व्यासंग खूप आहे.
गेली चाळीसहून अधिक वर्ष झाली ते अविरतपणे भजन कीर्तन प्रवचन करत संतांचे विचार सर्वसामान्य माणसा पर्यंत पोहचवित आहेत .ज्ञानेश्वरी पारायण , हरिनाम सप्ताह, संत मोतीराम महाराज दिंडी असेच एकादशी व अन्य प्रसंगानुरूपनिमित्ताने भजन कीर्तन व प्रवचन नित्यनियमाने जुना लोहा येथे करतात त्याची संत विचारांची सेवा निरपेक्ष आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत मोतीराम महाराज पुरस्काराने हभप।आत्माराम महाराज रामेज्वार रायवाडीकर याना सन्मानित करण्यात आले. यावेळीलोकमतचे संपादक संजय आवटे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प.विठ्ठल पाटील, श्री शंभू पंचअग्नी आखाडाचे मंहत लौकेश चैतन्य महाराज, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. रामशेठ गावडे उपस्थित होते.
या पुरस्काराचे आयोजन संस्थानचे समन्वयक विठ्ठलराव कदम व डॉ. मारुती आवरगंड यांनी केले संत मोतीराम महाराज संस्थानाने यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले
हभप आत्माराम महाराज यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल आ प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आ रोहिदास चव्हाण ,केशवराव मुकदम, यासह अनेकानी अभिनदन केले आहे