नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक असलेले अशोकराव गोविंदराव केंद्रे हे ३५ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० जुन रोजी वयोमना नुसार सेवानिवृत्त होत आहेत.
१९ ऑगस्ट ८९ रोजी नांदेड जिल्हा पोलीस मुख्यालय येथे पोलीस कॉन्स्टेबल प्रथम नियुक्ती पोलीस मुख्यालय येथे झाली, त्यानंतर वजिराबाद पोलीस स्टेशन येथे दोन वर्षे व ऊपविभागीय ग्रामीण पोलीस अधिकारी,वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालय,व नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सेवा बजावली आहे.
२५ ऑगस्ट रोजी उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. दि. ३० जुन रोजी नियमित वयोमान नुसार ३५ वर्ष २ महिने ११ दिवस प्रदिर्घ सेवा करून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल मित्र मंडळ यांच्या वतीने अभिनंदन होत असून आगामी भावी आयुष्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.