नवीन नांदेड l श्री गुरु गोविंद सिंग जी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड व प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धनेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने निःशुल्क नेत्र रोग तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात परिसरातील रूग्णांनी सहभाग नोंदविला.
सदरील शिबीर ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव सरपंच गंगाधर पाटील शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले,यावेळी माजी जि प. सदस्य मनोहर पाटील शिंदे,भुजंगराव भालके माजी पंचायत समिती सदस्य तथा ग्रा.प.पॅनल प्रमुख धनेगाव ,ग्रा.प.सदस्य तातेराव ढवळे,डॉ.लक्ष्मण चंदनकर, श्रीमती डॉ. प्रिया जाधव ,डॉ.प्रवीण मुंडे (तालुका आरोग्य अधिकारी), वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी राठोड डॉ. गजानन गुडपे डॉ.लता मुद्दी, डॉ.अमित रोडे ,तेलंग, ए.जी.पवार.
श्रीमती तारा शिंदे श्रीमती राजश्री पवार व सर्व अशा कर्मचारी गावकरी उपस्थित होते. या शिबिरामध्ये 90 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 17 संशयित मोतीबिंदू रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.