मुंबई| रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया अशा प्रमुख नेटवर्क प्रदात्यांनी अलीकडेच रिचार्ज प्लान्सच्या किमतीत वाढ केली. दरम्यान पेटीएम ग्राहकांना त्यांचे मोबाइल रिचार्ज कार्यक्षमपणे व्यवस्थापित करण्यासाठी सोईस्कर पर्याय देत आहे. कंपनीने आपल्या मंचावर सरासरी दैनंदिन रिचार्जेसच्या तुलनेत मोबाइल रिचार्जमध्ये १५ ते २० टक्के वाढीची नोंद केली आहे. तसेच दीर्घकालीन प्लान्स खरेदीसाठी देखील निवडीमध्ये वाढ झाली असल्याचे पेटीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
डेटा, अनलिमिटेड पॅक किंवा टॉप-अप्ससाठी पेटीएम रिचार्ज प्लॅन्सची व्यापक श्रेणी देते, ज्यामुळे वापरकर्ते टेलिकॉम ऑपरेटवर त्यांच्या गरजांना अनुसरून प्लॅन्सची निवड करू शकतात. पेटीएम युजर-अनुकूल इंटरफेस आणि इतर फायद्यांमुळे मोबाइल रिचार्जेससाठी सर्वात पसंतीचा प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये स्थिर पेमेंट पर्याय, डिल्स आणि कॅशबॅक ऑफर्स, तसेच रिचार्ज रिमाइंडर्सचा समावेश आहे.
वापरकर्त्यांना अॅपवर त्यांचे मोबाइल क्रमांक सेव्ह करण्यासोबत रिचार्ज प्लॅन्सची सुविधा देत पेटीएम भावी व्यवहारांसाठी विनासायास अनुभवाची खात्री देते. पेटीएम बदलत्या टेलिकॉम लँडस्केपमध्ये वापरकर्त्यांना कनेक्टेड ठेवण्यासाठी विश्वसनीय सोल्यूशन देते.
पेटीएमवर प्रीपेड मोबाइल क्रमांक रिचार्ज करण्याची पद्धत:
१. पेटीएम अॅप उघडा आणि ‘बिल पेमेंट्स बाय बीबीपीएस’ सेक्शनमध्ये जा.
२. ‘मोबाइल रिचार्ज’ निवडा आणि तुमचा मोबाइल क्रमांक (रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया) प्रविष्ट करा.
३. तुमचा रिचार्ज प्लॅन निवडा.
४. ‘प्रोसिड टू पे’वर क्लिक करा, पेमेंट पद्धत निवड आणि पेमेंट पूर्ण करा.
पेटीएमवर पोस्टपेड मोबाइल बिल भरण्याची पद्धत:
१. पेटीएम अॅप उघडा आणि ‘बिल पेमेंट्स बाय बीबीपीएस’ विभागामध्ये जा.
२. ‘मोबाइल पोस्टपेड’ निवडा आणि तुमचा मोबाइल क्रमांक (रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया) प्रविष्ट करा.
३. अॅप आपोआपपणे देय रक्कम निवडेल.
४. ‘प्रोसिड टू पे’वर क्लिक करा, पेमेंट पद्धत निवडा आणि पेमेंट पूर्ण करा.