हिमायतनगर। सकल ओबीसी समाज संघटणेच्या वतीने ओबीसी योध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे निषेध रॅली काढण्यात येत आहे. तरी तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी सकाळी ठीक 10 वाजता परमेश्वर मंदीरा समोर उपस्थित राहावे. असे आवाहन ओबीसी समाज संघटणा ता.अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, दिलीप आला राठोड यांनी केले आहे.
या संदर्भाने देण्यात आलेल्या निवेदनात म्हणाले आहे कि, मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष ओबीसी समुहाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर दि. ३० रोजी सार्वजनिक रस्त्यवर गाठून मराठा जातीच्या गुंडानी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून जीवघेणा हल्ला केला. सदरील घटका सोशल मिडीयावर प्रभावित करून त्याना बदनाम करण्याचे कटकारस्थान त्या समूहातील काही लोकांनी व समाजकंठकानी केल्याचे दिसून येत असून, त्यामुळे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्याने सकल ओबीसी समाजाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ दि. 3/9/2024 रोजी रैली परमेश्वर ते पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात येणार आहे.
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना Z + सुरक्षा देऊन हल्लेखोरांना त्वरीत अटक करावे. या रैलीत तमाम ओबीसी बांधवानी सहभागी होऊन सहाकार्य करावे. असे आवाहन ओबीसी समाज संघटणा ता.अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, दिलीप आला राठोड यांनी केले आहे.