हिमायतनगर। येथील योग शिबिरातील जेष्ठ योगशिक्षक कमलाकर कोरेकलकर गुरुजी आणि गौतम हनवते पेंटर यांची पतंजली योगपीठ हरिद्वार येथे होत असलेल्या पाच दिवसीय योग शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी हिमायतनगर यांच्या वतीने परमेश्वर मंदिर परिसर हिमायतनगर येथे उपलब्ध करून दिलेल्या योगा हॉलमध्ये मागील सोळा वर्षापासून पतंजली द्वारा नित्य योग वर्ग चालू आहे. आजपर्यंत असंख्य बांधव नियमित योगा करून रोगमुक्त झालेले आहेत. याच योग शिबिरातील जेष्ठ योगशिक्षक कमलाकर कोरेकलकर गुरुजी आणि गौतम हनवते पेंटर यांची पतंजली योगपीठ हरिद्वार येथे होत असलेल्या पाच दिवसीय योग शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल तसेच प्रशिक्षण शिबिरात जाण्यापूर्वी पतंजली योग वर्ग हिमायतनगरच्या वतीने शाल श्रीफळाने स्वागत सत्कार करून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांना प्रशिक्षणासाठी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते व सर्व संचालक मंडळींनी शुभेच्छा दिल्या.
तसेच हरिद्वार येथे प्रशिक्षणासाठी जात असलेल्या योग शिक्षक कमलाकर कोरेकलकर गुरुजी आणि गौतम हनवते पेंटर यांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड सर, कंठाळे सर, सटवाजी चवरे, रामरावजी सूर्यवंशी, प्रभाकर पळशीकर, वराडे सर, नाथा गंगुलवार सर, बाळू अण्णा चवरे, साहेबराव अष्टकर, सुभाष बलपेलवाड, मारोती लुम्दे, अनिल दमकोंडवार, अविनाश संगणवार, कदम सर, नंदकुमार पाटील आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.