शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील शिवणी येथील श्रीकृष्ण मंदिरात आज सोमवार दि.२६ आगस्ट व उद्या मंगळवार २७ आगस्ट असे एकूण दोन दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हभप जनकिराम महाराज कंधारकर यांचे भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन व महाप्रसादाचे कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवार दि.२६ आगस्ट रोजी शिवणी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने श्रीकृष्ण मंदिरात रात्री ८ वाजेपासून ११ वाजेपर्यंत हभप जानकीराम महाराज कंधारकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर २६ रोजी रात्री ११ वाजता कीर्तन संपल्यावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२७ आगस्ट मंगळवार रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत हभप जानकीराम महाराज कंधारकर यांचे गोपाळकाला काल्याच्या कीर्तनाचे आयोजन आहे.तर दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजिले आहे.करिता शिवणी आप्पारावपेठ इस्लापूर भागातील भाविकांनी या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे श्रीकृष्ण मंदिर शिवणी व्यवस्थापक मंडळी व शिवणी गावकऱ्यांच्या वतीने अवाहन करण्यात आले आहे.