नवीन नांदेड l गणगौरी लक्ष्मी सणाच्या निमित्ताने परिसरातील अनेक निवासस्थानी व ग्रामीण भागात महालक्ष्मी स्थापना विधीवत पुजन करून स्थापना केली असून मुखवटे , मखर,मंडप व सजावट केली असून मोठ्या संख्येने महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.
गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आगमन होणार असल्याने महिला भगिनी लक्ष्मी मंडप यासह अनेक वस्तू, सजावटीसाठी लागणारे साहित्य, मंडप,लाईट,डेकोरेशन साठी सिडको बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री साठी ऊपलब्ध झाले होते तर जनरल स्टोअर्स, ईलेक्ट्रॉनिक,यासह विविध प्रतिष्ठानचा अनेक दुकानात विविध साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले तर महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने सिडको परिसरातील विविध भागात पूजेचे साहित्य विक्री साठी आले होते.
गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आवाहन १० सप्टेंबर रोजी सायंकाळी झाले तर११ लासायंकाळी विधीवत महापूजा,आरती जेवण व १२ सप्टेंबर तारखेला दर्शन व रात्री उशिरा पर्यंत विसर्जन होणार आहे, गेल्या अनेक वर्षांपासून काही कुटुंबे हि परंपरा जपत आहे, काही कुटुंब मध्ये शंभर, पन्नास वर्षे पंरपरा कायम आहे, शहरी व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.
माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या निवासस्थानी अनुराधा गोरे सौ.आरती बालाजीराव पुयड, सौ.मजुषा सारंग नेरलकर, सौ.कुसुम ठाकूर, सौ.अर्चना सतिश मोरे, वैशाली तुकाराम पवार,शांताबाई देविदास बसवदे, माजी नगरसेविका प्रा.ललिता शिंदे,माजी नगरसेवक अशोक मोरे यांच्या निवासस्थानी सौ.संगीता मोरे,सौ.निरमला सतिश भेडेकर, सौ. कविता साईनाथ येरावार, सौ.सारिका प्रमोद टेहरे, तर बाभुळगाव येथे सरपंच पुंडलिक मस्के यांच्या निवासस्थानी सत्वशिला पुंडलिक मस्के पाटील प्रविण काळे यांच्या निवासस्थानी सौ. पुजा प्रवीण कुमार काळे पाटील यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी सजावट सुंदर व आकर्षक केली होती.
गुरूवारी महिलांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा रात्री महालक्ष्मी विसर्जन होणार आहे, लगभग चालेल्या महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रेलचेल चालू होती.