नांदेड| लोहा तालुक्यातील किवळा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व उपसरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात ३० जुलैला नूतन सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱी देशपांडे विस्तार अधिकारी यांनी सरपंचपदी नेहा साईनाथ टर्के तरउपसरपंचपदी सीमा व्यंकटी टर्के यांची बिनविरोध निवड घोषित केली.
किवळा येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ असून सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. यावेळी रामजी पाटील ढगे, माजी सभापती शंकर पाटील ढगे, यांच्या सह साईनाथ पाटील टरके, व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, निवडीनंतर गावकऱ्यांकडून नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या सत्कार करण्यात आला. निवडणूक साठी ग्रामसेवक अमृत शिंदे यांनी सहकार्य केले तर निवडणूक दरम्यान सोनखेड पोलीस स्टेशनचे बिट जमादार नागरगोजे व पोलीस कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.