नांदेड, आनंदा बोकारे। नांदेड नाळेश्वर ते रहाटी जैतापूर सोमेश्वरचा संपर्क तुटला असून, यामुळे नाळेश्वर मंडळातील पिके पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेली आहेत, अनेकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नांदेड तालुक्यातील नाळेश्वर नांदेड ते रहाटी सोमेश्वर जैतापूरचा संपर्क तुटला असून सकाळी शाळेत येणाऱ्या शिक्षक शासकीय दवाखाना या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली या संपर्कामुळे त्यांना आपल्या का र्यालयापर्यंत जाण्यासाठी विलंब लागला या दूध विक्रेत्यांनाही सकाळी या पाण्याचा सामना करावा लागला परंतु भागात अनेक वर्षापासून या या भागातील नागरिकांची मागणी असून सुद्धा वेळोवेळी भागाचा संपर्क तुटत असून प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी या भागातील मागणी आहे.
या संपर्क तुटलेल्या नागरिकांना या मदत करण्याचे काम शिवसेना चे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य गबू बोकारे उद्धव बोकारे काशिनाथ बोकारे जगन्नाथ बोकारे गोपाळ बोकारे देवानंद बोकारे पांडुरंग बोकारे विश्वनाथ बोकारे रतन बोकारे भागवत बोकारे राहुल लंगोटे या सर्व ग्रामस्थांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना या पाण्यातून प्रवास करू नका अशी विनंती करून त्यांनी प्रवाशांना मदत करण्याचे काम केले या भागात नदीचा प्रवाह जवळच असून विष्णुपुरी प्रकल्पाची दुपारी अकरा वाजता अकरा गेटमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने या नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत होता.
या संपर्क तुटल्याने नांदेडला जाणाऱ्या व मोतीला येणाऱ्या प्रवाशांची बराच काळ तारांबळ उडाली यामुळे या सोमेश्वर रहाटी जैतापूर या तीन गावचा संपर्क तुटत असल्याने प्रशासनाने तात्काळ या फुलांची उंची वाढवावी अशी मागणी वेळोवेळी करून सुद्धा प्रशासनाला आतापर्यंत जाग आली नाही. हा रस्ता 222 ला जोडा असून सुद्धा या नदीवरचा ब्रिज तात्काळ करावा व पुढील वर्षी सुद्धा संपर्क तुटणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी व दोन दिवसापासून पाऊस चालू असल्याने शेतकऱ्यांची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने 100% पिकाचे नुकसान झाले असून त्यांना पीक विमा व ओला दुष्काळ जाहीर करून त्यांच्यावर असलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.