नवीन नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणूक अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिनं ठिकाणी नाके तपासणी केंद्र करण्यात आली असून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी महसुल व पोलीस कर्मचारी यांच्या करण्यात येत असुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची नोदं करण्यात येत आहे.
लोकसभा पोटनिवडणुक व 87 नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुक अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या आदेशानुसार नांदेड लातूर रोडवर डेरला पाटी नजीक, नांदेड बोढांर असना रोड नजीक कै.शंकरराव चव्हाण चौक मार्गावर.
नांदेड हैदराबाद रोडवरील काकांडी जवळ तिन ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची तपासणी व्हिडिओ कॅमेराचा सहायाने कॅमेरामान महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत तपासणी चोविस तास करत असुन वाहन नंबर नोंदणी करत आहेत.