नांदेड/नायगांव| नायगाव विधानसभेचे आमदार यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहेत असा घनघात रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी राजेश पवार यांचा नामउल्लेख न करता शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगांव येथे आयोजित केलेल्या सहविचार सभेमध्ये घनाघाती टीका केली.
पांडुरंग शिंदे यांनी म्हटले की, अडीच लाख लोकातून एक हनुमान म्हणून आमदाराला आपण विधिमंडळामध्ये पाठवत असतो, हनुमानाचे काम आहे ,या भागातील सर्वसामान्य लोकांचे दुःख, वेदना ह्या सभागृहामध्ये मांडून या प्रश्नाला वाचा फोडणे. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, विमा कंपनी शेतकऱ्याला फसवत आहे आणि शेतकऱ्याला सरकारची आर्थिक मदत मिळत नाही, पीक कर्जासाठी बँका शेतकऱ्यांना दारात उभा करत नाहीत असे अनेक प्रश्न सोडवणे हे विद्यमान आमदाराचे काम आहे.
ई पीक पाहणी सारखा जटील प्रश्न मतदारसंघातील शेतकऱ्याच्या पुढे उभा असताना, शेतकरी सोयाबीन -कापूस आर्थिक साह्यापासून अनेक शेतकरी वंचित आहेत, आम्ही शेतकऱ्यांनी तहसील कार्यावर आसूड मोर्चा आयोजित केला पण आमदार महोदय या मोर्चाला लोकांना जाऊ देऊ नका म्हणून गावा- गावामध्ये आपल्या बगलबच्चांना सांगत आहेत, माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही आम्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नसला किमान आडकाठी तरी करू नका अन्यथा येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये मतदारसंघातील शेतकरी तुमचा सत्तेचा आणि पैशाचा माज जिरवणार आहे.
भास्करराव पाटील खतगावकर यांचा घेतला समाचार
भास्करदादा सातत्याने पक्ष बदलत आहेत, ते कधी काँग्रेसमध्ये ,कधी भाजपामध्ये , नेमके दादा कोणत्या पक्षात आहेत .आम्हाला कळत नाही. त्यांच्या अशा पद्धतीने पलट्या मारल्यामुळे उच्चशिक्षित असलेल्या त्यांच्या सूनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आलेले आहे.
शिवराज पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका करावी
शिवराज पाटील होटाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण आम्ही महायुतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून काम करत आहोत ,येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये काय गणित तयार होतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे? त्यामुळे आमच्यासारख्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्याला अडचण होईल अशी भूमिका आपण घेऊ नये असे सुचवात करत आपण महायुती सोबत राहणार असे शिंदे यांनी सांगितले.या सहविचार सभेला नायगाव विधानसभेतील नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.