नवीन नांदेड| नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक संघटनेच्या शाखा सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वृत्तपत्र विक्रेता बांधवांना श्री मुर्ती आप आपल्या निवासस्थानी स्थापना करण्यासाठी वाटप करण्यात आल्या, यावेळी पूजेचे साहित्य, केळी पाने, फुले, हार यासह इतर साहित्य देण्यात आले, यावेळी वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी गणपती बाप्पा मोरया घोषणा दिल्या.
सिडको वृत्तपत्र विक्रेता टिन शेड सेंटर येथे ७ सप्टेंबर रोजी सकाळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर,किरण देशमुख, गणेश डोळस, सारंग नेरलकर,महिला वितरक वंदना लोणे, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते रामनाथ दमकोडंवार, मदनसिंह चौहाण,शेख सयोधदीन, वृत्तपत्र विक्रेते सिडको संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर,सचिव बालाजी सुताडे यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. दरवर्षीच्या या उपक्रमाने वृतपत्र विक्रेते बांधव यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले असून श्री मुर्ती घेतल्या नंतर आपल्या पाल्यासह गणपती बाप्पा मोरया घोषणा देण्यात आल्या.