नविन नांदेड l सिडको नवीन नांदेड भागातील काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे
सटवाजी पिराजी कुंभारे यांनी पक्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंभिरे यांच्या मान्यतेनुसार व नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या शिफारशीनुसार अनुसूचित जाती विभाग नांदेड महानगराध्यक्ष सत्यपाल सावंत यांनी नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली.
सदरील निवडीचे पत्र नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी.आर.कदम काका,यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आले.यावेळी सत्यपाल सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, युवा नेते ॲड.प्रसेनजीत वाघमारे, शेख असलम,शेख कलीम,मोहम्मद नुरुद्दीन, प्रभू उरुडवड यांची उपस्थिती होती.
सदर निवडीबद्दल प्रा.अशोक मोरे, डॉ. अशोक कलंत्री,डॉ.करुणा जमदाडे, बापूसाहेब पाटील,महेश शिंदे, सौ.ज्योती कदम,चित्ते बाई, नारायण कोलंबीकर, देविदास कदम, योगेश भरकड, केशव कांबळे, किशनराव रावणगावकर, भि.ना.गायकवाड, प्रा. शशिकांत हटकर, यांच्यासह इत्यादीने अभिनंदन केले आहे.