हिमायतनगर,अनिल मादसवार| मागील पंचवार्षिक निवडणुकीत जीवाचे रान करून साहेबांचे काम करणाऱ्या काँग्रेसच्या निष्ठावंत युवा कार्यकर्ते पक्षात न्याय देण्यात दुजाभाव केला जातो. अशी नाराजी व्यक्त करत साहेबांची साथ सोडण्याचा तयारीत असल्याचा संदेश फेसुबक या सोशल मीडियावर व्हायरल करून नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांची चापलुसी करणाऱ्यां काही पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या वागण्याचामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुरावले जाऊ लागले असून, याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत आहे.
काँग्रेस पक्षाचे इमाने इतबारे काम करणारे अनेक युवा कार्यकर्ते सत्ताधारी काँग्रेस नेर्त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज झाले असल्याचे चित्र सध्या शहर व तालुका परिसरात सुरु असलेल्या विकास कामाच्या देवाण घेवाणीवरून दिसून येऊ लागले आहे. मागील विधानसभा निवडणूक पूर्व काळात हिमायतनगर येथील स्व. परमेश्वर भोयर या कट्टर काँग्रेस कार्यकर्त्याच्या सोबत शहरातील अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला होता. कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेने पक्षाचे काम करून साहेबांचा आदेश शिरसंधान मनाला. निवडून आल्यानंतर साहेबांकडून एखादं काम मिळेल..! अशी अपेक्षा धरणे साहजिक होती. पाच वर्ष लोटून गेले आता नव्याने विधानसभा निवडणूक लागण्याची वेळ आली मात्र त्या निष्ठावंत युवा कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही आणि दिलेला शब्द पाळला जात नाही. त्यामुळे आम्ही साहेबांची साथ सोडण्याच्या तयारीत आहोत अशी पोस्ट सोशल मीडियावर नाराज कार्यकर्त्याने व्हायरल केली आहे. या पोस्टची सर्वत्र जोरदार चर्चा होऊ लागली असून, अनेकांनी तर आमच्या पक्षात प्रवेश करा अशी ऑफरही त्या नाराज कार्यकर्त्यांना दिली असल्याचे दिसून येत आहे.
अनेक वर्षपासून प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचे काम करून पद तर सोडाच एखादे विकास काम देखील दिल जात नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक दुजाभाव केला जातो असल्याने साहेबांच्या कार्यशैलीवर युवा कार्यकर्ते संशय व्यक्त करू लागले आहेत. त्यातूनच आम्हाला पक्षात न्याय मिळत नसल्याची खंत मागील काही वर्षांपूर्वी देखील केली होती. त्यावेळी साहेबानी आम्हाला फॉर्च्युनर गाडीमध्ये बसवून नेऊन एड्याची समाज फडयाने काढल्यासारखं केले आहे. सध्या स्थितीत केवळ टक्केवारी देणाऱ्या आणि पुढे पुढे करणाऱ्या गुत्तेदार काम कार्यकर्त्याला देऊन मोठं केलं जात आहेत. आमच्या सारख्या इमानदार कार्यकर्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे युवक अरविंद वानखेडे, आकाश सूर्यवंशी यांनी मत सोशल मीडियावर जाहीरपणे मांडून मनातली खदखद व्यक्त केली आहे. एव्हढंच नाहीतर आगामी विधानसभा निवडणूक काळात आम्ही इतर पक्षाच्या नेत्यांचं समर्थन करून उघडपणे काम केलं तर कोणाला नवल वाटू घेऊ नये असेही व्हायरल पोस्टमध्ये लिहिलं आहे.
नेत्यांच्या निवडणूक काळात आम्ही कुत्र्यासारखा फिरून काम करायचं आणि साहेबाना मतदान मिळून द्यायचं…. निवडून आले कि साहेब… मात्र एका विशिष्ट समुदायातील चापलुसी करून टक्केवारी देणाऱ्या कार्यकर्त्याना गुत्तेदारी बहाल करून मोठं करतात हे आम्हाला रुचेना झालं आहे. त्यामुळे आम्ही नाराज असून, साहेबानी हिंदू समाजातील कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेऊ नये अशी प्रतिक्रिया नाराज काँग्रेस युवक कार्यकर्ता अरविंद वानखेडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टवरून बोलून दाखवली आहे.