हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम, क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, सहकार्यक्रमाधिरी डॉ.एल. बी. डोंगरे व नॅक समन्वय डॉ. गजानन दगडे तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री संदीप हरसूलकर आणि श्री लक्ष्मण कोलेवाड आदिंच्या उपस्थितीत महाविद्यालयातील अन्य कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व सहकारी प्राध्यापक आणि सर्व कार्यालयीन कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी योग प्रशिक्षक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने यांनी वेगवेगळ्या आजारावर उपचारासाठी करावे लागणारे योग आणि उपचार पद्धती याविषयीची सविस्तर माहिती देऊन सर्वांकडून अतिशय चांगल्या प्रकारे योगा प्रात्यक्षिके करून घेऊन जीवनामध्ये योगाचे महत्त्व पटवून दिले. योगाचे महत्त्व पटवून देताणा म्हणाले की,आज मोटापा ही अतिशय गंभीर समस्या समाजामध्ये झालेली आहे. त्यावर उपाय योजना करणे अतिशय महत्त्वाचे झालेले आहे. त्यासाठी मोटापा कमी करण्याचे आसन आणि मोटापामुळे उद्भवणारे विविध रोग यावर सविस्तर चर्चा यावेळी त्यांनी केली. आरोग्यमं धनसंपदा याविषयी आपले मोलाचे मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले.