नवीन नांदेड l नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अवैध चौरटी वाहतूक करीत असलेली एक टाटा कंपनी हायवा ,व एक टेपो सह दोन आरोपी एकुण 21लाख 90 हजार मुद्देमाल जप्त केला असुन दोन आरोपी अटक केली आहे,या प्रकरणी सहा ब्रास रेती जप्त केली आहे, या कार्यवाही मुळे खळबळ उडाली आहे.


पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों मोरे,पोहेकॉ मुपडे. पोकॉ भिसे, पोकॉसिरमलवार, पोकॉकांबळे,पोकाॅ जमीर, कदम, पोना मजहर सर्व पो.स्टे. नांदेड ग्रा.पोलीस अंमलदार यांनी गोपनीय माहितीचे आधारे रेतीची अवैध चोरटी वाहतुक करीत असलेली व एक टाटा कंपनीचा हायवा एम.एच.30 बि.डी. 2668 व एक टाटा कंपनीचा टेम्पो एम.एच.28एच 7944 ताब्यात घेवुन एकुण दोन आरोपीसह 21,90,000/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.


वरील दोन्ही वाहनावर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आरोपी चालक अंबादास गणेश बयने व जनार्दन गंगाराम लोणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोना
डफडे,व पोहेकाॅ राठोड हे करीत आहेत.


या कामगिरी बदल अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक,नांदेड,खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांनी अभिनंदन केले आहे.



