हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काहींना जीव गमवावा लागला तर अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात म्हणून हिमायतनगर तालुका सीडस्, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइडस् डीलर्स असोसिएशन तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.


असोसिएशनतर्फे ₹८३,२०० (अक्षरी – त्र्याऐंशी हजार दोनशे रुपये) इतकी रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया, मेन ब्रांच, मुंबई येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खाते क्रमांक 10972433751 मध्ये जमा करण्यात आली. या अनुषंगाने धनादेशाची प्रत व मदतीचे निवेदन तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे सादर करण्यात आले.


यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पळशीकर, उपाध्यक्ष मारोती पाटील लुम्दे, सचिव अमोल बंडेवार, तसेच सदस्य शाम ढगे, राजदत्त सुर्यवंशी, अनिकेत दमकोंडवार, दिलीप गुडेटवार, नागोराव काईतवाड, गजानन टोपलवाड, अवधूत कल्याणकर, रामेश्वर पाकलवाड, गणेश पाळजकर आदी कृषी व्यापारी उपस्थित होते. पूरग्रस्तांसाठी सहानुभूतीपूर्वक मदत करीत असोसिएशनने सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.




