नवीन नांदेड l पोलीस भरती सरावासाठी लवकरच युवकांना मैदान उपलब्ध करून देऊन व्यायाम शाळेसाठी हि प्रयत्न करणार असल्याचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी सांगितले.


सह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण मैदानाचे शुभारंभ नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर व युवानेते संजय पाटील घोगरे, प्रसिद्ध ऊधोजक गंगाप्रसाद तोष्णीवाल,पप्पू जाधव,अक्षय वटमवार, नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख राम पाटील काळे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख पद्माकर सावंत, उपनिरीक्षक जयश्री गिरे, गोविंदराव हंबर्डे,वैजनाथ वैध,प्रशिक्षीक सगरोळीकर,अर्जुन,व नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.


गेल्या अनेक दिवसांपासून मोदी मैदानावर युवक पोलीस भरती सराव करीत होते,या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानक स्थलांतर होत असल्याने असरजन येथील सामाजिक कार्यकर्ते नंदु वैध व खंडु पाटील वैध यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत संबंधित युवकांना आपल्या शेतात सरावासाठी मैदान उपलब्ध करून दिले होते.

या मैदानाच्या शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ.बोढारकर यांनी या संदर्भात क्रिडा मंत्री यांच्यी प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन पाठपुरावा केला असल्याचे सांगून लवकरच सरावासाठी मैदान उपलब्ध करून देणार असल्याचे सांगुन व्यायाम शाळेसाठी हि प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोटावार यांनी तर प्रास्ताविक नंदु वैध यांनी केले, यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत असरजन गावातील उपस्थित युवकांनी केले.

यावेळी आ.बोढारकर यांच्या भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.सरावासाठी मैदान उपलब्ध करून दिल्या बद्दल नंदु व खंडु वैध यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी नांदेड व ग्रामीण भागातील कार्यरत विविध पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील युवक ,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.