सकाळी ६ वाजता सर्व अमरनाथ यात्रेकरूं आपाल्यापरीने तयार होऊन श्रीगरकडे जाण्यासाठी उत्सुक झाले होते. बालटाल येथे दानशूर व्यक्तींनी बरेचं लंगर सुरू केले आहेत.लुधियानाचे महादेव लंगर,शिवशंभू महादेव लंगर यासह इतर अनेक लंगर होती.प्रत्येक लंगरमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळी उत्कृष्ट दर्जेदार पदार्थ खाण्यासाठी ठेवण्यात आली होती.त्यामधे इडली सांबार,बुंदीचे लाडू, चहा टोष्ट,पोहे,ब्रेड पकोडे ,उपमा,हलवा, अग्रेका पेठा, जेवणामध्ये तंदूर रोटी, आल्लुची भाजी,शिरा,खीर,जिलेबी,पराठे, मुगाची दाळ,वरण भात यासह इतर स्वादिष्ट आणि रुचकर अप्रतिम असे अनेक खाद्य पदार्थ केले होते.सकाळचा नाश्ता करून आठ वाजता आम्ही बालटाल बेस कॅम्प सोडले. टेन्ट पासून ते पार्किंग पर्यंतचे अंतर जवळपास दोन किलोमीटरचे आहे. गर्दीमध्ये आपली माणसे हरवू नये म्हणून सर्वांना कॅप घालण्याची सक्ती केली. बेस कॅम्प पासून पार्किंग पर्यंत फ्री बस सेवा उपलब्ध आहे. पण त्या साठी रांग मोठी होती. तेथील ड्रायव्हरला प्रत्येकी पाचशे रुपये इनाम देतो असे सांगितल्यावर लगेच दोन बसेस आमच्यासाठी तयार झाल्या. पार्किंग मध्ये बसचे चालक तय्यार होवून आमची वाट पहात होते.सर्व सामान ठेवून परत एकदा बम बम भोले चा जयघोष करत आम्ही श्रीनगर कडे निघालो.
वाटेत निसर्गरम्य सिंधु नदी किनारी अनेकांनी सेल्फी,व्हिडिओ शूट करून निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेतला.तिथून थोड्याच अंतरावर मनिगाम येथील इंडियन आर्म्मी कॅम्प येथील लंगर मध्ये गुलाबजामुन, फुलके,राजमाची भाजी,वरण भात,जिलेबी,दही,भात असे चविष्ट जेवण केले. लखनौ लंगरचे प्रधान अमित त्रिवेदी यांचा सन्मान करतांना मी असे सांगितले की, कठीण अमरनाथ यात्रा ही मिल्ट्री, लंगर व घोडेवाले या फक्त तीन लोकांमुळे सफल होते.मिल्ट्रीवाले आपली ड्युटी बजावत असतात.घोडेवाले पैसे घेतात.पण लंगर वाले निस्वार्थ भावनेने सेवा करतात.माझे हे वक्तव्य अमितजींना इतके आवडले की, त्यांनी सर्वांसाठी कोल्ड्रिंक्स मागवून आग्रहाने पाजले.साऊंड सिस्टिम वर भोले की बारात निकली हे भजन लावून सर्वांना नाचायला लावले.हे दृश्य इतरांनी ही शुट केले.या कॅम्प मध्ये आर्मी हॉस्पिटल होते.अनेकांनी आपल्या आजाराची तपासणी करून योग्य ते उपचार घेऊन मेडीसिन घेतले.
श्रीनगर येथे पोहचल्यावर येथील प्रसिद्ध निशाद गार्डन ला भेट दिली.तिथे हौशी जोडप्यांनी काश्मीरी पेहराव घालून फोटो काढले. दल लेक परिसरात मोठ्या गाड्यांना नो एंट्री असल्यामुळे तातडीने दहा टाटा सुमो ची व्यवस्था करून सामानासहित आम्ही शिकारा स्टॅन्ड ७ वर पोहोचलो. त्या ठिकाणी माझे ट्रॅव्हल एजंट सज्जाद भाई हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार केला. मी नेहमी असे करतो की, बसचे चालक, हॉटेल मालक यांचा सुरुवातीला सत्कार करतो. त्याचा परिणाम असा होतो की, जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ते सेवा देतात. एका हाऊसबोट मध्ये तीन ते चार बेडरूम असतात.
एका जोडप्याला एक बेडरूम मी आधीच ऑलाउट केली होती. त्यामुळे अडचण आली नाही. शिकारातून सर्वजण हाऊस बोट ला गेले.तिथे फ्रेश झाल्यानंतर जगप्रसिद्ध दल लेक सरोवरात शिकारा राईड चा आनंद लुटला. मी सफाईदार पणे पप्पू घेऊन शिकारा चालवत असल्याचे पाहून सर्वजण चकित झाले. रात्री आमच्या सोबत असणारे सौ.किरण व श्री.नारायण गवळी यांच्यातर्फे जेवनाची व्यवस्था प्रत्येक हाऊस बोट ला करण्यात आली होती. चविष्ट भोजनाचा आनंद घेऊन आलिशान हाऊस बोट मध्ये रात्रभर विश्रांती घेतली. (क्रमशः)