उस्माननगर, माणिक भिसे। महाभारत , रामायण ,अन्य ठिकाणी ” गुरू – शिष्याचं ” नात कसं असतं हे पाहतो ., पण उस्माननगर ता.कंधार येथील इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक , मुख्याध्यापक विश्वासराव लोखंडे गुरूजी व सौ.नलिनीताई लोखंडे यांचा चाळीस – बेचाळीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांनी निष्ठापूर्वक… आदरपूर्वक घरी येऊन शाल , हार,टोपी श्रीफळ देऊन सत्कार करून शुभ आशिर्वाद घेतला.
चाळीस , बेचाळीस वर्षांपूर्वीचे शिक्षण वाघीणीच्या दुधासारखे असायाचे , त्या काळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबर शिस्त , वेळेचे महत्त्व , कडक शिक्षण असायाचे अनेक विद्यार्थी एकमेकांना भेटले की , जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. त्या … गुरुजी मुळे मी शिकलो…घडलो….. स्वतः च्या …पायावर उभा आहे. , त्यांचे ऋण ( व्यक्त करण्यासाठी) फेडण्यासाठी विविध पदांवर कार्यरत असलेले विद्यार्थी एकत्र येतात . ज्या गुरूजी च्या हाताखाली शिकलो त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तळमळ लागलेली असते . असाच एक प्रसंग उस्माननगर येथे गुरू – शिष्याच नातं पहावयास मिळलं.
विविध क्षेत्रात काम करून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्याला इंग्रजी भाषेचे सहज सोप्या पद्धतीने प्राथमिक शिक्षण देणारे आदर्श शिक्षक विश्वासराव लोखंडे गुरूजी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. नलिनीताई या उभयतांचा हृदय स्पर्शी गौरव करण्यात आला.
डॉ. होमी भाभा अणू संशोधन संस्था भोपाळ व मुंबई येथे सेवा करुन सेवानिवृत्त झालेले चंद्रकांत पांडे, पशुवैद्यकीय सेवेतून निवृत्त झालेले दिगंबर सूरेवाड, प्रविण पाठक, बालाजी शिंदे यांनी लोखंडे गुरुजींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मिठाई देवून गौरव केला. यावेळी लोखंडे यांचे मित्र माजी मुख्याध्यापक किशनराव कराळे यांची उपस्थिती होती. आठवण करून मुद्दामहून गुरुच्या घरी येवून आदराने , निष्ठापूर्वक गौरव करून शुभ आशिर्वाद घेण्यात आला . ही कौतुकास्पद बाब ठरली आहे.