हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील हरडफ या गावी एका लोकर्पण सोहळ्याच्या निमितान महायुतीचे हिगोली लोकसभाचे माजी खा. हेमत पाटील व महाविकास आघाडीचे हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर हे ह्या सोहळ्या निमित्तानं एकञ आल्याने माञ राजकीय गोटात नव्या ‘दोस्ती’ ची चर्चा माञ चांगलीच रंगली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे हरडफ या गावी आमदार व खासदार स्थानिक निधीतून 40 लाख रु खर्च करुन हनुमान मंदीर सभागृहाच लोकर्पण सोहळा पार पडला. थाटात सोमवारी महायुतीचे माजी खा हेमत पाटील आणि आ.माधवराव पाटील जवळगावाकर यांच्या प्रमुख उपस्थित हा लोकर्पण सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे काही महीण्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन राजकीय पक्षाचे स्थानिय प्रमुख लोकप्रतिनिधी एकञ येत असल्याने माञ नेमके राजकीय शिकार कुणाची होणार आहे. याबाबतीत राजकीय वर्तुळात माञ अशी चर्चा रंगतांना दिसुन येत आहे. सामाजिक दृष्टिकोनातून विरोधी व सताधारी पक्षाचे स्थानिय दिग्ज लोकप्रतिनिधी अश्या सामाजिक कार्यात एकञ येत असल्याने तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने भूषणवाह फार चागली बाब असली तरी ही राजकीय दोस्ती टिकून राहावी अशी अपेक्षा ही अनेक जणांनी व्यक्त केली आहे.