नांदेड l किटकनाशक क्षेत्रातील मोठ्या कंपन्याकडून मनमानी कारभारानुसार शेतकरी हितास तिलांजली शेतकऱ्यांकडून मनमानी किंमत वसूल करण्यासाठी बेकायदेशिर रित्या कृषी केंद्र चालकांवर सक्ती करण्यात येत आहे आजघडीला किटक नाशकाचे दर मोठ्या प्रमाणात आहेत.तसेच शेतकी औषधे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. औषधी उत्पादन किमतीपेक्षा ५००% जास्त दराने शेतकऱ्यांना माल विक्री केला जात आहे यासर्व बाबींवर लक्ष वेधून घेण्यासाठी किसान जन आंदोलनाचे सचिन कासलीवाल यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पुणे येथे भेट घेतली आहे
महाराष्ट्रात नवीन राजकीय पर्वला सुरुवात करतांना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली किसान जन आंदोलन चे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांच्या सोबत महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना ची यावेळी उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात नवीन राजकीय पर्याय या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देण्यात येणार आहे महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची आज अशी सुरुवात झाली यावेळी शेतकरी बांधवांची तसेच महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती
रविकांत तुपकरांनी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची केली स्थापना…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली आहे. येत्या विधानसभेमध्ये रविकांत तुपकर महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीच्या माध्यमातून 25 जागा लढवणार आंहेत. 25 जागांमध्ये बुलडाणा जिल्हयातील 6 जागांचा समावेश आहे. तसेच लवकरच राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी जाहीर केले.
शेतकरी व व्यापारी बांधवांबाबत किटकनाशक कंपन्याचे अवाजवी धोरण…!
अलिकडे उत्पादनांच्या किमतीवर डिस्काऊंट देण्यासाठी वाढवून ‘एमआरपी’ छापण्यात येऊ लागली आहे. मोठे उत्पादक आपल्या एकाच उत्पादनाची विविध ठिकाणी वेगवेगळ्या दराने विक्री करत असल्याने छोट्या व्यापाऱ्यांची कोणतीही चूक नसताना ग्राहकांचा त्यांच्यावरील विश्वास संपत चालला आहे. ‘एमआरपी’मुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्व उत्पादनांवर एमआरपी, वजन, त्याचप्रमाणे उत्पादनमूल्य प्रकाशित करणे बंधनकारक असावे ग्राहकाला योग्य किमतीत वस्तू मिळण्याचा ज्या प्रमाणे हक्क आहे त्या प्रमाणे उत्पादनमूल्य समजणे हा देखील ग्राहकाचा हक्क आहे.