हिमायतनगर,अनिल मादसवार। चांगली कर्म करावी, जेणेकरून देवांनी तुमची वाट बघावी,,, संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 22 व्या वर्षी समाधी घेतली. मनुष्य जन्माचा उद्देश सफल झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यावेळी लोकांनी त्यांना न जाण्याची विनंती केली. चांगलं काम करणाऱ्या लोकांना देव सुद्धा प्रेम करतो.. आणि प्रेम करणारी लोक भरपूर असतात. मात्र आपल्या मनुष्य जीवनात वय जास्त दिवस झाले की, घरातील लोक सुद्धा मरायची वाट पाहतात, त्यामुळे मानव जन्माला आल्यानंतर संत, महंतांचे विचार ऐकून पुण्य कर्म करून मनुष्य जीवनाचे सार्थक करा. जेणेकरून देवाचं स्मरण करत मनुष्याने देह ठेवला पाहिजे… तर कपाळाला लावण्यासाठी माती सुद्धा सोबत नेता येत नाही असा उपदेश हभप.अर्जुन महाराज खाडे आळंदीकर यांनी केला.
हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, शिवमहापुराण कथा संपन्न झाली, त्यानंतर शुक्रवार दि.16 पासून संत ज्ञानेश्वरी भाव कथेला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वरी भावकथेच्या चौथ्या दिवशी अर्जुन महाराज खाडे आळंदी यांच्या मधुर वाणीतून संतांचे चरित्र सांगताना पुढे ते म्हणाले की…मानव जन्माला आल्यानंतर संसाराचा गाडा हाकताना संत, महंतांचे विचार ऐकून आपल्या हातून काहीतरी चांगले पुण्य कर्म करून मनुष्य जीवनाचे सार्थक करायाला हवे. देह जावो अथवा राहो… पांडुरंग लिन व्हावं… या ओवीचा सारांश सांगतांना अर्जून महाराज खाडे म्हणाले की, जीवनात काही केलं तरी याचा काहीच फायदा नाही. मृत्यू चांगला आला पाहिजे यासाठी भगवंताचे स्मरण करत मृत्यू यावा. दररोज भगवंताचे नामस्मरण करणे आवश्यक आहे. एक दिवस एक महिना केल्याने होत नाही तर सतत माळ जपली पाहिजे.
आयुष्यभर काय केलं यांच माहीत नाही… पण मारताना देवाचं स्मरण येत मनुष्याने देह ठेवला पाहिजे… मृत्यूसमयी राम कृष्ण हरी… जय जय रामकृष्ण हरी… राम तुमच्या अवडीचा देव आहे. त्या देवाचं स्मरण करा…तुमच्या आवडीचा अन्य कोणता देव आहे…. त्या देवाचं स्मरण करा. ईश्वराने प्रत्येकाचा नावाची साढेतीन हाथ जमीन केली आहे.. ती स्मशान भुमित आहे. धन, दौलत, फ्लॅट, बिल्डिंग, जमीन, जयजाद हे काही सोबत येणार नाही.. एव्हढच नाही तर कपाळाला लावण्यासाठी माती सुद्धा सोबत नेता येत नाही.
महाभारतातील धृतराष्ट्र संपुर्ण भारताचा राजा होता त्यांना 100 मुलं होती, त्यांनी कधी संतांचं ऐकलं नाही, त्यांचा मुलगा दुर्योधन अहंकारी होता, व सुद्धा गुरू, आई वडिलांचं, संत, यांचं कधी ऐकत नव्हता, कधी दान धर्म केलं नाही… शेवटच्या वेळी वंशाचा दिवा लावायला देखील माणूस शिल्लक राहिला नाही. मनुष्य जाताना त्याच्यासोबत फक्त चांगलं वाईट कर्म येतात. मिळालेल्या मनुष्य जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल.. जीवन उज्वल करून पुण्य पदरी पडून घ्यायचं असेल तर भान ठेवा… पुण्य कर्म करा संतांचे, माऊलींचे विचार ऐका… ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. त्यात माउलींनी प्रयेक गोष्टीचा समाधान लिहिलं आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुम्हाला समजण्यासाठी थोडी अवघाड आहे, मात्र वारंवार वाचल्यानंतर तुम्हाला समजेल कि ज्ञानेश्वरी ग्रंथाची बरोबरी करणारा अन्य कुठलाही ग्रंथ नाही. कलियुगात सर्वार्थाने सर्वमान्य आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ केवळ ज्ञानेश्वरी आहे.
यासाठी सर्वानी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करावे त्यातून चांगली कर्म करण्याची ऊर्जा मिळते. ज्ञानेश्वरीचे वाचन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाचे कल्याण होऊन चांगले मरण येते. मात्र आपल्या मनुष्य जीवनात मानूस केवळ उपभोगाकडे जास्त वेळे देतो आहे. दान धर्म करण्याकडे दुर्लक्ष करतो आहे. संत महात्म्याने मान सन्मान देत नाही. चांगले विचार ऐकत नाही… माणसाकडे जोपर्यंत पैसे अदला आहे, तोपर्यंत सर्वच जण विचारतात. वय जास्त झाले हातात पैसे येणं बंद झाला कि, घरातील लोक सुद्धा मरायची वाट पाहतात. हि वेळ येऊ नये यासाठी चांगले कर्म करा.. दान धर्म करा.. संत महात्म्यांचे विचार ऐका.. ज्ञानेश्वरीचे वाचन करा…वडील धाऱ्यांची सेवा करा… मंदिरात डोकं टेकवल्याने देव पावत नाही तर चांगले कर्म…संतांनी दाखविलेल्या दिशेने चालणे… कीर्तन, भजन, यातून संतांचे विचार मार्गदर्शन ऐकून देवाचे नित्य नियमाने स्मरण कराल तरंच मानवी जीवांचे कल्याण होईल असे आवाहनही त्यांनी श्री परमेश्वराच्या दरबारात आयोजित ज्ञानेश्वरी भावकथेच्या मंचावरून उपस्थितांना केले. यावेळी महाविरचंद श्रीश्रीमाळ, वामनराव बनसोडे, लताताई पाध्ये, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, विलासराव वानखेडे, आदींसह शहरातील शेकडो महिला पुरुष भाविक भक्त उपास्थीत होते.