नांदेड| येथील नांदेड उत्तर मतदार संघातील काँग्रेसचे निष्ठावान कार्येकर्ते तथा जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या वतीने पावसाळी वातावरण लक्षात घेता गरजूंना छत्री वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून खा.वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती चौक परिसरातील झेंडा चौक येथून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली होती. त्या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध भागात छत्री वाटप करण्यात येत आहे.
त्यानुसार राजेश पावडे मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात झेंडा चौक व परिसर, हस्सापूर नसरतपूर ,निळा,एकदारा,कांचननगर ,वाणेगाव,कल्याण नगर,भानपुर आंबेडकरनगर,नई आबादी,नुरी चौक व नवीन मोंढा येथील नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले असून शहरासह ग्रामीण भागातही छत्र्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येणार असल्याची माहीती संयोजक राजेश पावडे यांनी यावेळी दिली.
राजेश पावडे मित्रमंडळाच्या वतीने मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीनुसार गरजूंना छत्री वाटप हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे सर्व विभागातील जनतेने उस्फुर्त सहभाग घेतला असून येत्या काही दिवसांत विधानसभा क्षेत्रातील विविध भागात छत्री वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहीती संयोजक राजेश पावडे यांच्या वतीने यावेळी देण्यात आली.
नवा मोंढा येथील छत्री वाटप कार्यक्रमाच्या वेळी राजू तावडे, तात्याराव शिंदे,शिवाजी कदम,प्रकाश जोगदंड,शिवाजी दराडे,केशव शेजुळे बद्री शेठ,विलास पावडे, प्रा.गणेश हटकर सत्यपाल,शेख मुख्तार,तुकाराम पावडे,अभिलाष पावडे,मोहनराव ढगे,मंगल सिंग,गोविंद पाटील,गणेश पावडे,शैलेश गजभारे,मंगेश देवकांबळे,सुमित भातलवंडे आदींसह मार्केट कमिटीचे संचालक व कार्यकर्त्यांची उपस्थित होते.