श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। श्रीदत्त जंन्म निमित्य माहूरात भाविकांची मांदियाळी जमली होती दि.१४ डिसेंबर रोजी हजारों भाविकांनी हजेरी लावत प्रभू दत्तात्रयाचे चरणी लिन होऊन आशीर्वाद घेतले. गत पाच दिवसा पासून आश्रम व विविध मठावर दत्त नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि,१४ मार्गशीर्ष पूर्णिमा दू,२.३० वा गडावरील श्रीदत्त मंदिरात गणपती पुजन करण्यात आले व दत्त मंदिर मुख्य गाभा-यात महंत प.पू.मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.परीसरातील देवदेवतांचे महंतांच्या समाधिचे पुजन करण्यात आले दत्त जन्म सोहळ्या करीता आतील सभामंडपात सर्व एकत्र आले पोथीचे पुजन मंहत महाराज यांच्या पादुका पुजन वंश परंपरागत ब्राम्हण पुजारी पुरोहित ऋषिकेश जोशी,विलास जोशी, रवीन्द्र जोशी, विकास,जोशी, यानी दत्त जन्म पोथी वाचन केले किर्तनकार देवकत्ते व संच यांनी अंभग,किर्तन भारूड केले व पाळण्यात बाळ दत्त ठेऊन पाळना दिला जन्म उत्सव साजरा करून आरती करण्यात आली.
यावेळी चिंतामन भारती, वासुदेव भारती, चिरंजीव भारती,हरीहर भारती, सर्व महापुरुष उपस्थित होते,यांच्यासह हजारों भाविकांच्या उपस्थितित जन्म उत्सव साजरा करण्यात आला.साईनाथ महाराज वसमतकर, गोवर्धन महाराज, व विविध आश्रमात किर्तन.भजन.भारुड.फटाकांच्या अतिषबाजीत दत्त जंन्म उत्सव साजरा करण्यात आला देवदेवेश्वर मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . दत्त नामाच्या गजराने गेल्या पाच दिवसापासून माहूर शहरात दिगंबरा, दिगंबरा वल्लभ दिगंबरा देवा दत्ता दत्ता च्या गजराने माहूर नगरी दुमदुमून गेली.
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रासह शेजारच्या तेलंगाना, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून दत्तभक्ताच्या दिंड्या माहूर शहरात दाखल झाल्या होत्या. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दत्त शिखर संस्थान मंदिर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती.
गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रमात मठाधीश राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर बीतनाळकर बरबडेकर यांच्या हस्ते दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला. तसेच येथे मोठ्या भक्ती भावात किर्तन झाल्यानंतर आलेल्या हजारो भाविकांना आमरस पुरणपोळी सह तुपाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी भाविकासह बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व विभागाचे कर्मचारी यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विविध आश्रमात भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील हज़ारों भाविकांनी विविध ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता , तहसिलदार राजकूमार राठोड.सपोनी शिवप्रसाद मुळे. न.प. मुख्याधिकारी विवेक कांदे, नप कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी व दंत्त संस्थान , विविध कार्यालयातील अधिकारी जातीने लक्ष देत आहे.