नांदेड। जिल्ह्यातील देगलूर बसस्थानकास धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी केली आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका तसेच उपजिल्हा असलेला देगलूर शहर तेलंगणा,महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवर वसलेला असून आजूबाजूच्या राज्यातील नागरिकांची देगलूर बस स्थानकावर नेहमी वर्दळ असते. महाराष्ट्रातील तमाम हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट असलेले धर्मवीर आनंदराव दिघे यांचे नाव देगलूरच्या बस स्थानकास देऊन शहरातील आनंद दिघे यांना मानणाऱ्या हिंदू बांधवांना न्याय द्यावा.
अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे कडवट शिवसैनिक असलेले राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी केली आहे. विशेष म्हणजे यामधे धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा जपनाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांनी आमच्या निवेदनाची दखल घेत मागणी पूर्ण करावी अशी विनंती देखील या पत्राद्वारे केली आहे.