हिंगोली। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसचे वारंगा फाटा उपसरपंच ओम व्यंकटराव कदम व कुर्तडी येथील युवा काँग्रेस नेते कपिल पानपट्टे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे व हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसचे वारंगा फाटा उपसरपंच ओम व्यंकटराव कदम व कुर्तडी येथील युवा काँग्रेस नेते कपिल पानपट्टे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी सह संपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेश्वरराव पतंगे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, तालुकाप्रमुख धनंजय पाटील दातीकर, डोंगरकडा सरपंच पप्पू भाऊ अडकिने, पप्पू वीर,दत्तराव माने ,अविनाश पानपट्टे, प्रसाद बोंढारे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.