नांदेड| एसटी कामगारांचे प्रश्न 20 ऑगस्ट पर्यंत सोडविण्याचे आश्वासन देऊन न पाळणे म्हणजेच एसटी कामगारांना फसविण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे टीका एसटी सेनेचे विभागीय सल्लागार प्रकाश मारावार यांनी कृती समिती तर्फे आयोजित केलेल्या संप.धरणे आंदोलनात केली.
शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन वाढ. घर भाडे. 2018 ते 2024 पर्यंतचा महागाई भत्ता. सह इतर प्रश्न संदर्भात महाराष्ट्रातील तमाम एसटी बांधवा तर्फे कृती समिती स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार पत्र व्यवहार.मंत्र्याचे बैठका. मुख्यमंत्र्याच्या बैठकीत सचिवस्तरीय 20 ऑगस्टपर्यंत घेण्याच्या आश्वासन देऊन सुद्धाशब्द न पाळणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या निषेधार्थ आज
नांदेड जिल्ह्यातील डेपोतून एकही लाल परी सुटली नाही. एसटी कामगार कृती समिती संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी धरणे आंदोलन करून एसटी बंद पाडले.
नांदेड बस स्थानकामध्ये एसटी कामगार सेनेचे विभागीय सल्लागार प्रकाश मारावार यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रकाश मारावार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी फसविले सविस्तर संबोधित केले. वारंवार संपाची नोटीस. मंत्राच्या बैठका घेऊन 20 ऑगस्ट पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले. दिलेला शब्द न पाळणे. फसविणे शिंदे यांचा स्थायीभाव असून जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत एकही बस डेपोतून बाहेर जाणार नाही असा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला.
या आंदोलनात एसटी कामगार सेना. कामगार संघटना. इंटक. काष्टाबाईट. सह इतर अनेक कामगार संघटना संपात सहभागी झाले यावेळी सुधीर पटवारी. जय कांबळे. सीपी कदम. रमेश भुसा. शरद नायक. संजय मादास. निखिल गाळेवाड. एमडी गोस. राजेश कांबळे. डी के पिले. सचिन पाटील. बालाजी पाटील. एमडी पाटील यांच्यासह एसटी कामगार कृती समितीचे अनेक जण उपस्थित होते.