श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l माहूर गडावरील श्री रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.दुपारी साडेबारा वाजता घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली.


महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला सकाळी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार दि,३० मार्च रोजी सकाळी ६ वाजता टि,व्हि, स्टार सनई वादक नितिन धुमाळ व संच नासिक यांच्या सनई च्या सूरात प्रसिद्ध घोषात अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने सुरवात झाली.गणेश पुजन,कलश (वरुन) पुजन,पूजारी भवानिदास भोपी, शुभम भोपी, विनायक फांदाडे, विश्वस्त बालाजी जगत यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक सिंगार, अलंकार करून पिवळा रंगाचे पैठनी महावस्त्र परीधान करण्यात आले.


श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभा-यातिल व परीसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदीर, श्री परशुराम मंदीर,श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडा मध्ये मृत्तिका (माती) भरुन त्यात संप्त धान्य टाकुन, कुंडावर मातीची कलश,त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, साभोताल पाच उसाचे धांडे उभारुन आणी त्या अधारे कलशावर (पुष्पहार) पहिली माळ चढवून चढविण्यात आली रेणुका देवीच्या प्रांगणात विश्वस्त दुर्गादास भोपी, शुभम भोपी यांनी निशान चढविला. गुढी उभारून विधिवत पूजा केली तर विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी गुढी ची महाआरती केली.

श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभा-यातील घटस्थापना पुजारी भवानीदास भोपी, विनायकराव फादांडे यांनी केली,देवीची महाआरती संस्थान चे सचिव तथा किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोन्थुला भाप्रसे, तहसीलदार तथा पदसिध्द कोषाध्यक्ष किशोर यादव, यांच्या हस्ते करण्यात आली .यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी,विश्वस्त संजय कान्नव,अनिल काण्णव, अरविंद देव, बालाजी जगत,व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत.

महाआरती नंतर कुमारिका व सुहासिनी पूजन करण्यात आले. मंदिर परिसरात छबिना काढण्यात येऊन परिसरातील देवतांचे पूजन करण्यात आले. नऊ दिवस चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे गडावर भक्तिमय वातावरण राहणार आहे.