हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने वाळू लागलेल्या पिकांची चिंता करत असताना दोन दिवसापासून हिमायतनगर तालुका परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला आहे. यावेळी भर पावसात वाजत गाजत नगरपंचायतीच्या मनाच्या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली होती. हर हर महादेवच्या नामाचा जयघोष करून विवाहसोहळा थाटात सपन्न झाला.
कृषी प्रधान भारत देशात ” बळीराजाचा बैलपोळा ” हा सर्वात महत्वाचा सन आहे. या उत्सवाच्या पूर्व संध्येपासून पोळ्याची तयारी केली जाते. येथील युवा शेतकरी जंगल परिसर पिंजून काढून पळसाच्या पानाचा देठवा आणून अन्नदात्या सर्जाराजाची खांदे मळणी करतात. आणि बळीराजाला पोळ्याच्या दिवशीचे जेवणाचे निमंत्रण दिले आहे. शेतात घाम गाळून काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकर्यांसोबत खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या (ऋषभराजाचा) बैल पोळा उत्सव निमित्ताने बैलांना घुंगरमाळ, मोरके, कासारे, झुली, गोंडे, बेगडी, बाशिंग, वार्निश, नाडापुडी, नागेलीचे पान गाडीने सजविण्यात आले. तसेच घरदाराच्या दोन्ही बाजूने पळसाच्या मेंढ्या लाऊन, ग्रह लक्ष्मीच्या हाती अंगणात रांगोळ टाकून, पूजा – अर्चनेने हिमायतनगर येथे आनंदात साजरा करण्यात आला आहे.
दरवर्षी पारंपरिक पद्धतीने हिमायतनगर शहरातील नगरपंचायतीची माणची बैलजोडी असते या बैलजोडीची आगमन झाल्यानंतर हिमायतनगर येथिल हर हर महादेवच्या नामाचा जयघोष करत मुख्यधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते पूजन करून ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत नगरपंचायतीचे प्रश्नातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच आजी माजी राजकीय पदाधिकारी आणि शहरातील प्रतिष्ठी नागरिक व शेतकरी युवक देखील मोठ्या संख्येने सामील झाले होते. वाजत गाजत मिरवणूक मुख्य रत्स्याने पोलीस ठाण्याजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ येताच एकच जयघोष झाला. आणि येहे पाच मंगलाष्टक म्हणून सर्जा -राजाचा विवाह सोहळा थाट संपन्न झाला.
वर्षातून एकदा येणारा बैलपोळ्याच्या सण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. वर्षभर याच वृषभराज्याच्या खांद्यावर शेतीच्या मशागतीची जबाबदारी ठेऊन शेतीत पिके उगवली जातात. याच बळीराज्याच्या पोळा उत्सवाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनि बाजरपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. उत्सवावर वाढत्या महागाईचे ढग असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे. ग्रामीण संस्कृतीत पोळ्याच्या दिवशी बैलांचं पूजन केलं जातं. बैलांचा साजशृंगार करत त्यांना पुरणपोळी खाऊ घातली जाते. आणि गावातल्या मिरवणुकीत बैलांना फिरवलं जातं. असा हा सण यंदा हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला आहे.
हिमायतनगर येथिल बैलपोळा मिरवणुकीत एका शेतकऱ्याने तर चक्क आम्हाला फक्त निर्सगाने साथ दिली पाहिजे….. कोणत्या सरकारच्या पैकेजची गरज नाही….. कारण सरकारला आम्ही पोसतो सरकार आम्हाला नाही…. असा संदेश बैलाच्या पाठीवर लिहून शेतकरी बैलोजोडीचा साज शृंगार करून दाखल झाला होता त्याने लिहिलेल्या संदेशाने सर्वांचे लक्ष वेधले होते.