हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील छत्रपती नगर, रेल्वे स्टेशन रोड, हिमायतनगर येथील रहिवाशी देशसेवेच्या कार्यात स्वतःला वाहून घेत जम्मू काशिमामध्ये ड्युटीवर असलेले रामकुमार ससाणे बोरगावकर यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून मध्यरात्री काही अज्ञान चोरट्यांनी चोरी करण्यासाठी घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आले नाही. हा प्रकार CCTV कैमेऱ्यात कैद झाला आहे.


दरम्यान या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस ठाण्याला संपर्क करावा म्हटलं तर त्या ठिकाणी शासकीय दूरध्वनी क्रमांक नाही त्यामुळे इमर्जन्सी मध्ये नागरिकांनी पोलीस ठाण्यात कसा संपर्क साधावा असा सवाल पुढे येऊ लागला आहे. याकडे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी रामकुमार ससाणे यांनी केली आहे.

पोलिसांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन चोरांची ओळख पटवून मुसक्या अवळाव्यात जेणे करून शहरात चोरीचे प्रकार घडणार नाहीत, सीसीटीव्हीत दिसणाऱ्या चोरट्यांनी तोंडाला मुसक्या बांधल्या असल्याने त्यांना ओळखणं अवघड बनले असले, चोरट्यांच्या हालचाली वर पोलिसांनी लक्ष देऊन बंदोबस्त करावा अशी रास्त मागणी शहरातील नागरिकांतून केली जाते आहे

छत्रपती शिवाजी नगर मधील याच घरासमोर आसलेल्या श्री पुरी यांच्या घरी मागील सहा महिन्यापूर्ण चोरी झाली होती. त्यानंतर अनेकांनी आपापल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, यामुळं पोलिसांना चोरट्यांच्या हालचाली वरुन तपास करणे सोयीचे होणार आहे, ही बाब लक्षात घेता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि नागरिकांना संपर्क साधण्यासाठी पोलीस ठाण्यात शासकीय दूरध्वनी असायला हवा अशी मागणी होत आहे.
