नांदेड| अखिल भारतीय बंजारा सेना या सामाजिक संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदावर रवींद्र गणेश राठोड मु. बळीराम तांडा पोस्ट. पोटा बु. ता. हिमायतनगर जि. नांदेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्ती पत्र 08/07/2024 ते 08/07/2025 पर्यंत अखिल भारतीय बंजारा सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बंजारा हृदय सम्राट मा. भाऊसो. कांतीलाल छगन नायक यांच्या हस्ते देण्यात येऊन नियुक्ती करण्यात केली आहे.
नियुक्तीपत्रात म्हणले आहे कि, नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय बंजारा सेना सामाजिक संघटनेच्या जिल्हास्तरावर, तहसील स्तरावर, गावपातळीवर तांडा स्तरावर बंजारा समाजाचे संघटन करावे. प्रत्येक तांडा स्तरावर अखिल भारतीय बंजारा सेनेचे मंडळ नेमून समितीचे फलक लावून कार्यकारिणी जाहीर करावी. तसेच बंजारा समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा घेऊन संघटनेचा विस्तार करावा असेही देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात मा. कांतीलाल छगन नायक राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा सेना यांनी म्हंटल आहे.
तसेच या पदावर काम करताना पुढील सूचनांचे पालन करणे बंधनकारक असून, 1) जर तुम्ही संस्थेच्या विरोधात काम केले तर तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. 2) सामाजिक कार्य करताना तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आढळल्यास कारवाई केली जाईल. 3) संस्थेचे अधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणे अनिवार्य आहे. 4) तुमची नियुक्ती होताच, त्या तारखेपासून एक महिन्याच्या आत कार्यकारिणी तयार करणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचे पद रद्द केले जाईल (काढून टाकले जाईल) असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.