हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरात विविध घडामोडी झाल्यानंतर पंधरा दिवसात दोन पोलीस निरीक्षक बदलून गेलेले आहे. आता हदगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरक्षक म्हणून राजेश पुरी यांची नव्यानेच नियुक्ती झाली आहे.
गत काही दिवसांमध्ये हदगाव शहरात मागील पंधरवाड्यात मध्ये विविध घडामोडी घडून नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरक्षक सदाशिव भडीकर यांच्यावर काही गंभीर आरोप लागले. त्यांच्या जागी प्रभारी पोलीस निरक्षक म्हणून कुंभारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांची देखील बदली करण्यात येऊन आता हदगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरक्षक म्हणून राजेश पुरी यांची नियुक्ती झाली आहे.
पोलीस निरीक्षक राजेश पुरी हे प्रभारी आहेत की, कायमस्वरूपी आहेत ही माहिती मिळू शकली नाही. हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे 50 पेक्षा जास्त गाव आणि हदगाव शहर मोठे आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत सध्या विविध अवैध धंदे वाढलेले आहेत. तसेच वाढता अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप तसेच गेल्या काही वर्षांपासून नागरिक व पोलिसाच समन्वय नसणे. ह्या व्यतिरिकत पोलिसांची मान्यपदापेक्षा संख्या कमी असणे ह्यातूनच कायदा व सुव्यवस्था राखणे असे आव्हान नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकावर आहे.