नवीन नांदेड। भाजपा महिला आघाडीच्या मोर्चा प्रदेश सर चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे बोकारे यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.
भारतीय जनता पार्टी आपले नेते, देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित असलेले भाजपाचे संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबुत करण्याकरिता प्रदेश मोर्चचा माध्यमातून आपण जास्तीत जास्त वेळ देऊन चांगल्या प्रकारे काम कराल अशी नियुक्ती पत्रात उल्लेख केला असून सदरील नियुक्ती चित्रा वाघ यांनी केली आहे.
सदरील नियुक्ती पत्र माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते २२ सप्टेंबर रोजी देण्यात आले, या वेळी नवनियुक्त महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या नियुक्ती बदल ललिता शिंदे यांच्ये अभिनंदन होत आहे.